चंद्रपूर : मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत अन्याग्रस्त महिलांनी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तेथे येऊन जोरदार घोषणाबाजी केली. कलकाम नावाच्या कंपनीत पैसे गुंतवणाऱ्या लोकांची फसवणूक झाली असून, या कंपनीला मनसेचे स्थानिक पदाधिकारी मदत करीत आहेत. अशा पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, यासाठी या महिला इथे आल्या. राज ठाकरे सध्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. त्याचवेळी हॉटेलबाहेर महिलांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी महिलांची भेट घेत त्यांना दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांची फसवणूक केलेल्या कंपनीला मनसेचे पदाधिकारीच वाचवत आहेत, त्यांची मदत करत आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी घेऊन महिलांनी राज ठाकरेंच्या हॉटेल समोर धरणे आंदोलन केले. यावेळी संबंधित कंपनी आणि त्या कंपनीला मदत करणारे मनसेचे पदाधिकारी दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी महिलांना दिले. या कामाची जबाबदारी त्यांनी अविनाश जाधव यांच्याकडे सोपवली आहे. त्यानंतर ते अमरावतीकडे रवाना झाले.
राज ठाकरे तब्बल ९ वर्षांनंतर काल चंद्रपुरात (Chandrapur) दाखल झाले. यापूर्वी २०१३ मध्ये ते आले होते. नागपूर ते चंद्रपूर मार्गावर खांबाडा, वरोरा, पडोली आणि चंद्रपुरमध्ये मनसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आज येथे सकाळी ९.३० वाजतापासून ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्ते ९ वर्षांनंतर आपल्या नेत्याला बघून उत्साहित झाले आहे. काल सायंकाळी येथील विश्रामगृहावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.