Bachchcu Kadu On Cabinet Expansion :  Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu On Cabinet Expansion : '...तर गुवाहाटीला गेलो नसतो, 'त्या'साठी उद्धव ठाकरेंचे आभार'; बच्चू कडू स्पष्टच बोलले

Bachchcu Kadu On Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचा गुलाम म्हणून..

सरकारनामा ब्यूरो

Vidarbha News : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप ( Maharashtra Cabinet Expansion) याबाबत एकच चर्चा सुरू आहे.मात्र आता मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याचे समजते आहे. दरम्यान सरकार समर्थक आमदार बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला होता "आपण आज ११ वाजता आपली पुढील वाटचाली संदर्भातली भूमिका जाहीर करणार आहोत, असं बच्चू कडू म्हणाले. मात्र आता कडू यांनी आपण मंत्रिपदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. कडू म्हणाले, "मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंत्रिमंडळ विस्तारावेळी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. आम्ही दोन आमदारांनी त्यांची भेच घेतली. उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं की, आमच्या सरकारला पाठिंबा द्या. तेव्हा एकनाथ शिंदेही उपस्थित होते. आम्ही पाठिंबा दिला. बऱ्याचदा विरोधीपक्ष आणि इतर पक्षाकडून भरपूर आमिषं आली. मात्र उद्धव ठाकरेंनी मला मंत्रिपदाची संधी दिली. त्यांचे आभार मानतो."

"उद्धव ठाकरेंना आपण दिव्यांग मंत्रालय तयार व्हाव यासाठी नेहमी भेटत राहिलो. त्यावेळेस मात्र दिव्यांग मंत्रालय झालं नाही. त्याचवेळी दिव्यांग मंत्रालय झालं असतं तर, कदाचित गुवाहाटीला जाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता. जेव्हा आम्ही एकनाथ शिंदेंकडे गेलो तेव्हा आमची अट होती की, दिव्यांग मंत्रालय निर्माण करा. त्यांनी ते कबूलही केलं. माझ्यासाठी हे आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. देशातलं हे पहिलं दिव्यांग मंत्रालय आहे. माझ्या गुवाहाटीला जाण्यामुळे देशातल पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं, त्यामुळे मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन, असे ही कडू म्हणाले.

यापुढे आपण मंत्रिपदाची मागणी करणार नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपदाच्या समावेशावर मी माघार घेत आहे. मात्र आपण शिंदे - फडणवीस सरकारमध्ये कायम राहू, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT