Yashomati Thakur submits memorandum to SP demanding SIT probe in Amravati sexual exploitation case. sarkarnama
विदर्भ

Amravati Case : परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण, यशोमती ठाकूर आक्रमक; आरोपींवर SIT मार्फत कारवाईची मागणी

Yashomati Thakur Polise SIT : तरुणीचे लैंगिक शोषण करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायर करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ पोलिस अधिक्षकांना भेटले.

Roshan More

Yashomati Thakur News : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (परतवाडा) येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या प्रकरणी नराधमांवर आणि त्यांच्या सर्व साथीदारांवर मोक्कासह कठोर कलमान्वये कारवाई करावी, यासाठी काँग्रेस नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्या आहेत.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अमरावतील ग्रामीणछे पोलिस अधीक्षक, अमरावती रेंजचे आयजी यांची भेट घेतली. यावेळी या गंभीर प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकाद्वारे (SIT) करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार भाई जगताप, खासदार बळवंतभाऊ वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आणि माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी केले.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, अचलपूरमधील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. केवळ मुख्य आरोपीच नाही, तर या गुन्ह्यात त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व साथीदारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करावा, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा देखील यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिला.दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोषींवर तात्काळ कठोर पावले उचलण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

धर्म, जात काढण्यापेक्षा...

प्रत्येक प्रकरणात धर्म जात काढण्यापेक्षा गृहखात्याने सायबर सेलने अजून सजगपणे काम करणे गरजेचे आहे. या ठिकाणी कारवाई करून घर तोडत आहेत, तर खरात प्रकरणात अशोक खरातचे घर का अजून तोडलेले नाही? अशोक खरातचे घर देखील तोडले पाहिजे, खरातची पसार झालेली बायको तिला शोधून तुरुंगात डांबले पाहिजे. आणि खरातचे जे एजंट लोक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, असे देखील यशोमती ठाकूर म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT