Sharad Pawar and Yashomati Thakur Sarkarnama
विदर्भ

Yashomati Thakur on Sharad Pawar : शरद पवार भाजपसोबत गेले, तर त्यांचे नुकसानच होईल !

Sharad Pawar : शरद पवार खरंच भाजपसोबत जाणार का, याची चर्चा देशभर होत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Amravati Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नीती आणि धोरणांना भविष्यात शरद पवार पाठिंबा देऊन आमच्यासोबत येऊ शकतात, अशा आशयाचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परवा परवा केले होते. तेव्हापासून शरद पवार खरंच भाजपसोबत जाणार का, याची चर्चा देशभर होत आहे. (Whether Sharad Pawar will really go with BJP is being discussed all over the country)

यासंदर्भात आज (ता. २६) माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांना पत्रकारांनी विचारले असता, शरद पवार या वयात या परिस्थितीमध्ये त्यांच्या मूळ विचारधारेपासून दूर जाऊन ते भाजपसोबत जातील, असे वाटत नाही.पण ते जर गेले तर त्यांचे नुकसान होईल. कारण महाविकास आघाडीला मोठे भविष्य आहे आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडी निवडून येईल, भारतात ‘इंडिया’च येणार, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सार्वजनिकरीत्या महाराष्ट्रातील एकंदरीत घडामोडी बघितल्या तर मूळ शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि मूळ राष्ट्रवादी कॉंग्रेस ही शरद पवार यांची आहे. जे लोक बाहेर गेले ते सांविधानिक दृष्ट्या अपात्र आहेत.

यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेईल, हे आधीपासून सर्वांनाच माहीत आहे. हे आयोग, तपास यंत्रणा सरकारच्या एजन्सी म्हणून काम करतात. शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय काहीही येवो, खरा निर्णय जनतेच्या न्यायालयातून येणार आहे आणि तो आमच्याच बाजूने असणार आहे, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

भारतीय जनता पक्षात (BJP) दम राहिलेला नाही. म्हणून ‘घर चलो अभियान’सारखे उपक्रम राबवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या अभियानातूनही जनतेने काय संदेश द्यायचा, तो दिला. त्यामुळे भाजप नेत्यांची घाबरगुंडी उडालेली आहे.

त्यांना कळून चुकले आहे की, आपण किती पाण्यात आहोत. निवडणुका (Elections) जिंकू शकत नाही. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते लोक होऊ देत नाहीये. कारण एकदा निवडणुका झाल्या की त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे, असेही आमदार ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT