Yashomati Thakur Sarkarnama
विदर्भ

Yashomati Thakur : 'लाडक्या' योजनांवरून यशोमती ठाकूर यांचा निशाणा; म्हणाल्या, 'सरकार भावा-बहिणींमध्ये भांडण...'

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणून 1500 रुपयांत महिलांची बोळवण केली आहे. तर सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Roshan More

Yashomati Thakur News : सरकारने लाडकी बहीण योजना घोषित करत महिलांना 1500 रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी, सुशिक्षित तरुणांना कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरमहा 6 ते 12 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे घोषित केले. मात्र, यावर काँग्रेस नेत्या, आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे.

राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणून 1500 रुपयांत महिलांची बोळवण केली आहे. तर सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मान जनक रक्कम द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये कार्य प्रशिक्षणा दरम्यान तर पदविका झालेल्या तरुणांना आठ हजार आणि पदवीधर तरुणांना कार्य प्रशिक्षणा दरम्यान दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

भावा-बहिणीत भांडण लावण्याचा प्रयत्न

एकीकडे लाडक्या भावाला दहा हजार रुपये देण्याचा सरकारचा निर्णय आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीची मात्र दीड हजार रुपयात सरकार फसवणूक करत आहे. यामध्ये लाडक्या भावा-बहिणींमध्येच भांडण लावायचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दिसत आहे ,असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला.

शिक्षक संघटनांचा विरोध

कंत्राटी शिक्षकांना वेतन मिळत नाही. मात्र, सरकार योजनांच्या नावाखाली बेरोजगारांवर पैशाची उधळपट्टी करत आहेत, असे सांगत काही शिक्षक संघटनांकडून सरकराच्या 'लाडक्या' योजनांना विरोध केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT