APMC Elections Results News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काल पहिल्या टप्प्यात सात बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये दिग्रस, यवतमाळ, बाभुळगाव, वणी, महागाव, पुसद आणि नेर येथील निकाल लागले. आज (ता. ३०) उर्वरित आठ बाजार समित्यांसाठी मतदान झाले असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. (Counting of votes has started)
कळंबमध्ये सर्वप्रथम मतमोजणी सुरू झाली. येथे व्यापारी अडते गटातून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले. येथे माजी मंत्री वसंतराव पुरके आणि प्रवीण देशमुख महाविकास आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. राळेगाव बाजार समितीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रफुल्ल मानकर वसंतराव पुरके यांच्यासोबत आहेत. राळेगावमध्येही कळंबमध्ये मिळालेलाच कौल राहण्याची शक्यता आहे.
बाभुळगाव बाजार समितीमध्ये भाजपचे आमदार अशोक उईके यांना धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे. आधीच बाभुळगाव बाजार समिती त्यांच्या हातून गेली. भाजपप्रणीत पॅनलला तेथे चारच जागा भेटल्या. कळंबमध्ये आणि राळेगाव बाजार समितीमध्ये यापूर्वी कॉंग्रेसचीच सत्ता होती. यावेळी मतदार महाविकास आघाडीला कौल देतील, असे एकंदरीत चित्र सध्या दिसत आहे.
आज दारव्हा, बोरी अरब, कळंब, राळेगाव, झरी जामणी, मारेगाव, आर्णी आणि घाटंजी या आठ बाजार समितीमध्ये मतदान झाले. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असलेले वर्चस्व मोडून काढण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपच्या पदरी आतापर्यंत निराशाच आली आहे.
विदर्भात (Vidarbha) आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये (Elections) बव्हंशी ठिकाणी महाविकास आघाडीनेच (Mahavikas Aghadi) गुलाल उधळला आणि सहकारातील आपले वर्चस्व सिद्ध केले. तर भाजप (BJP) अजूनही सहकारामध्ये पाय रोवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. आज रात्रीपर्यंत काही निकाल हाती येणार आहेत. त्यानंतर कोण किती पाण्यात आहे, हे कळणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.