Tulsinagar Grampanchayat Sarkarnama
विदर्भ

Yavatmal District News : तुळशीनगरच्या सरपंच, उपसरपंचासह चार सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाने खळबळ !

Tulsinagar : नरेंद्र राजुसिंग राठोड यांनी सहा सदस्यांविरोधात तक्रार केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Disqualification action was taken in Tulsinagar Grampanchayat : पुसद विधानसभा मतदार संघात तुळशीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचासह इतर चार सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. नऊ सदस्यांपैकी सहा जण अपात्र ठरल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Six of the nine members have been disqualified, causing a stir)

महागाव तालुक्यातील बंजाराबहुल तुळशीनगर ग्रामपंचायतीमध्ये एकूण नऊ सदस्य आहेत. जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत सरपंच नंदा गजानन पवार, उपसरपंच कैलास हरदास आडे व इतर सात सदस्य निवडून आले. मात्र, तुळशीनगर येथील नागरिक प्रेम रामचंद्र पवार, नरेंद्र राजुसिंग राठोड यांनी यवतमाळ येथील अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सहा सदस्यांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता.

तक्रारीनुसार, तुळशीनगर ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी सरकारी, ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण केले असून सरकारी जागेचा बेकायदा वापर व उपभोग, ग्रामपंचायत कामातून आर्थिक मोबदला, खोट्या अपत्याचा दाखला, कर मागणी बील विहित मुदतीत न भरणे या बाबींमुळे त्यांचे सदस्यत्व कायद्याने अपात्र असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आलेली होती.

यासाठी महाराष्ट्र (Maharashtra) ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ज-१), अधिनियम १९५८ चे कलम १४ - ग आणि १४- ह संदर्भ देण्यात आला. या अर्जावर अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ प्र.कि. दुबे यांच्या दालनात सुनावणी झाली. अर्जदाराच्या बाजुने ॲड. बदनोरे यांनी बाजु मांडली. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचे अहवाल तपासून अपर जिल्हाधिकारी यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजूर केला.

सरपंच नंदा गजानन पवार, उपसरपंच कैलास हरदास आडे, वत्सलाबाई विनोद राठोड सदस्य, उद्दल मधुकर पवार सदस्य, पंजाब मोतीराम राठोड सदस्य, कमलाबाई विनोद चव्हाण सदस्य अशा सहा सदस्यांना सदस्यपदी राहाण्यास अपात्र ठरवत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एखाद्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंचासह सदस्यांचे मोठ्या प्रमाणात सदस्यत्व रद्द होण्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग असावा.

एकोप्याऐवजी वाद विकोपाला..

पुसद (Pusad) मतदार संघातील तुळशीनगर ग्रामपंचायत आदर्श मानली जात होती. या ग्रामपंचायतीमध्ये एकोप्याने सर्व कामे होत होती. आता मात्र घराघरांत राजकारण शिरल्याने आपसातील वाद विकोपाला गेले आहेत. साहजिकच तक्रारी वाढल्या. त्यामुळे एकोप्याऐवजी आता वाद विकोपाला गेले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सरपंच, उपसरपंचासह न्यायालयीन (Court) प्रक्रियेतून सहा जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या (Collector) या निकालामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. आता ग्रामपंचायतीमध्ये केवळ तीन सदस्य शिल्लक राहिले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT