Dr. Ravi Wairagade with his team.
Dr. Ravi Wairagade with his team. Sarkarnama
विदर्भ

ओमायक्रॉनशी लढण्यासाठी आपला मेंदू वाढवू शकतो रोगप्रतिकार शक्ती...

केवल जिवनतारे

नागपूर : आपला मेंदू नवीन विचार स्वीकारतो. नवीन गोष्ट शिकवतो. आपण घेतलेल्या नवीन अनुभवाने तो बदलतो. मेंदूवर तणाव असतो, त्यावेळी आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते. मात्र उत्साही असल्यास सकारात्मक विचारातून मेंदूचा वेग वाढतो, मनातील भीती दूर होते, अशावेळी कोरोना (Corona) असो की, ओमायक्रॉनसारखा (Omycron) नवीन व्हेरियंट यावर मानसिक बळातून रोगप्रतिकारशक्तीमुळे विजय मिळवता येतो, असा दावा जेनेटिक्स हेल्थ गुरू डॉ. रवी वैरागडे (Dr. Ravi Wairagade) यांनी आज येथे केला.

ॲडव्हान्स हेल्थ फॅमिली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कोरोना, ओमायक्रॉनसारख्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘आरोग्यम-३६०’ अंतर्गत ॲप तयार केला असून मोफत याचा लाभ घेता येईल, असे डॉ. वैरागडे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मनात भीती असताना उपचार करण्याची वेळ येते तेव्हा ते आपला मित्र होऊ शकते. म्हणूनच आपला मेंदू आपल्याला बरे करू शकतो, हे समजून आपण नवीन साधने आणि मानसिक दृष्टिकोन लागू करण्याचा दरवाजा उघडू शकता, असे डॉ. वैरागडे म्हणाले.

https://twitter.com/SarkarnamaNews/status/1467145445071671297

समाधानी असल्याने वाढते टेलोमिअर..

रक्तदाब असो की, मधुमेह या बऱ्या न होणाऱ्या आजारांवर केवळ नियंत्रण मिळवण्यासाठी आपण औषध घेतो. ते मुळासकट उपटून काढण्यासाठी उपचार होत नाही, हे आपणच मनात घट्ट बसवून ठेवले. यामुळे मेंदूवर सतत तणाव असतो,यामुळे शरीरातील टेलोमिअरचा कमी होतो. मनातील विचार सकारात्मक असल्याने टेलोमिअरचा आकार वाढतो, असा निष्कर्ष संशोधनातून पुढे आला आहे, अशी माहिती डॉ. रवी वैरागडे यांनी दिली.

टेलोमिअर्स लहान होऊ देऊ नका, उत्साही राहा- मेंदूचा वेग वाढवण्यासाठी मानसिक आरोग्याची भूमिका महत्त्वाची आहे. वेदना आणि विचार या सर्वांवर मेंदूचे नियंत्रण असते. वेदनेला दूर सारत आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी मानसिक आरोग्य जपावे. मन समाधानी ठेवावे, रोगप्रतिकार शक्ती वाढते.

-डॉ. रवी वैरागडे, जेनेटिक हेल्थ तज्ज्ञ, नागपूर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT