Nagpur ZP Sarkarnama
विदर्भ

Nagpur ZP Reservation : ZP आरक्षणामुळे भाजपच्या दावेदारांना जिल्हा परिषदेत नो एंट्री, अध्यक्षपदाचीही संधी हुकली

BJP No Entry In Nagpur ZP Ovr Chairmanship Reservation : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून भाजपसाठी अडचणीचे ठरले आहे.

Aslam Shanedivan

  1. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.

  2. आरक्षणाच्या नव्या समीकरणामुळे अनेक संभाव्य उमेदवार शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

  3. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना आणि घडामोडींना सुरूवात झाली आहे.

Nagpur News : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव झाले आहे. या आरक्षणामुळे भाजपच्या दिग्गज नेत्यांवर आता घरी बसण्याची वेळ आलीय. अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, दुसरे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, अनिल निधान, आतीष उमरे या सर्वांचे सर्कल हे महिलांसाठी राखीव झाले आहेत.

गेल्या 13 वर्षांत पहिल्यांदाच भाजपच्या पुरुष नेत्याला अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी चालून आली होती. मात्र या आरक्षणामुळे अनेकांचा पत्ता कट झाला आहे. आरक्षणामुळेच यापूर्वी मनोहर कुंभारे यांना उपाध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर मात्र, त्यांच्या पत्नी सुमित्रा कुंभारे यांना संधी मिळाली.

मनोहर कुंभारे यांनी माजी मंत्री सुनील केदार यांना धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना डावलून आशीष देशमुख यांनी संधी भाजपने दिली आणि ते निवडूनही आले. मनोहर कुंभारे यांनी बंड करून नये म्हणून त्यांच्याकडे काटोलचे जिल्हाध्यक्ष देऊन त्यांना शांत करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांचा डोळा अध्यक्षपदावर होता. पण येथे माशी शिकली आणि तेलकामठी आणि केळवद हे दोन्ही गट महिलांसाठी राखीव झाले. पण केळवदमधून त्यांच्या पत्नी सुमित्रा कुंभारे यांनी संधी दिली जाईल, असे दिसून येते आहे. रामटेकचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊतही यांचीही संधी गेली आहे. त्यांचे नांद सर्कल अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. तास आणि मालेवाडा हे महिलांसाठी राखीव झाले आहेत. भिवापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट वाढूनही आनंदराव राऊत यांना त्याचा लाभ झाला नाही.

त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे विरोधी गट नेते आतीष उमरे यांचा टाकळघाट गट अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाला आहे. उमरे हे अनुसूचित जातीमध्ये येत असले तरी त्यांचा गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनाही घरी बसावे लागणार आहे. कदाचित त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.

भाजप नेते अनिल निधान यांचा गटही महिलांसाठी राखीव झाला आहे. नागपूर माजी जि.प.सदस्य सतीश डोंगरे, दुधराम सव्वालाखे यांचे क्षेत्र सुद्धा राखीव झाल्याने त्यांनाही पर्याय उरला नाही. पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य वेंकट कारेमोरे हे मात्र बचावले आहेत. भाजपमधील ज्येष्ठ नेते असून यापूर्वीही ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा गट सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे.

खात गटातील राधा मुकेश अग्रवाल आणि कैलाश बरबटे हे ही बचावले असून कुही तालुक्यातील सिल्ली गट सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. येथे भाजपच्या प्रमिला दंडारे सदस्य आहेत. नागपूर ग्रामीणमधून कापसी खुर्द सर्वसाधारण गटासाठी असल्याने येथून भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर राऊत यांना संधी मिळू शकते. पण भापजच्या उज्ज्वला बोढारे यांना पुन्हा जुन्या रायपूर गटात जावे लागणार आहे.

FAQs :

प्र.१: जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणासाठी राखीव झाले आहे?
👉 हे पद ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव झाले आहे.

प्र.२: या आरक्षणामुळे कोणत्या पक्षाला फटका बसला?
👉 भाजपच्या दिग्गज नेत्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

प्र.३: या निर्णयाचा राजकारणावर कसा परिणाम होईल?
👉 जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन बदलण्याची शक्यता आहे.

प्र.४: भाजपचे कोणते नेते या आरक्षणामुळे मागे पडले?
👉 अनेक वरिष्ठ नेते ज्यांनी अध्यक्षपदाची तयारी केली होती, आता बाहेर पडले आहेत.

प्र.५: स्थानिक पातळीवर काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत?
👉 या निर्णयामुळे राजकीय नेत्यांमध्ये नाराजी आणि चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT