Amravati District ZP Teacher Bank.
Amravati District ZP Teacher Bank. Sarkarnama
विदर्भ

ZP Bank News : जिल्हा परिषदेच्या शिक्षक बँकेत वादळ, दावे-प्रतिदाव्यांनी तापले राजकीय वातावरण...

सरकारनामा ब्यूरो

Amravati District ZP Teachers Bank Politics : सेवेतून मुक्त झाल्याने जिल्हापरिषद शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह दोन संचालकांना नाममात्र सभासद घोषित करण्याबाबतचे पत्र विभागीय सहनिबंधकांकडून बँकेच्या सरव्यवस्थापकांना देण्यात आले. त्यामुळे बँकेच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. (A storm has arisen in bank politics)

विरोधकांनी अध्यक्षांची खुर्ची डळमळीत झाल्याचा दावा केला असून स्वतः अध्यक्षांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये दोन्ही बाजूंनी कायदेशीर लढा दिल्या जाण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. अमरावती (Amravati) जिल्हापरिषद (ZP) शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत, तसेच दोन संचालक रामदास कडू व संभाजी रेवाळे हे सेवानिवृत्त झाले आहेत.

बँकेच्या उपविधीनुसार ते बँकचे सभासद राहू शकत नाहीत, अशी तक्रार विरोधी संचालक प्रभाकर झोड, संजय नागे, मंगेश खेरडे, मनोज चोरपगार व गौरव काळे यांनी विभागीय सहनिबंधकांकडे केली होती. त्यानुसार विभागीय सहनिबंधक डी. एम. पालोदकर यांनी अध्यक्ष गोकुलदास राऊत, संचालक रामदास कडू, संभाजी रेवाळे हे निवृत्त झाल्याने उपविधी क्रमांक १० अ नुसार सामान्य सभासद म्हणून राहिलेले नसल्याने आपल्या स्तरावर कार्यवाही करावी, असे पत्र सरव्यवस्थापकांना जारी केले आहे.

दुसरीकडे बँकेच्या उपविधीमध्ये अशी तरतूदच नसल्याचा दावा अध्यक्षांसह दोन्ही संचालकांनी केला आहे. त्यामुळे पेच अधिकच वाढला आहे. सेवानिवृत्त झाल्याने अध्यक्ष व संचालकांना पदावर राहता येत नाही आणि पदावर असेपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, त्यामुळे कारवाई करावी, असे निवेदन आम्ही पाच संचालकांनी विभागीय सहनिबंधकांना दिले होते, असे शिक्षक सहकारी बँकेचे संचालक प्रभाकर झोड यांनी सांगितले.

सेवानिवृत्ती संबंधातील नियम हा केवळ पतसंस्थांपुरताच मर्यादित आहे. तो सहकारी बँकेला (Bank) लागू होत नाही. असे असले तर शिक्षक बँकेतील जवळपास दोन हजार सभासद सध्या निवृत्त आहेत. त्या सर्वांचे सभासदत्व रद्द करावे लागेल, त्यासोबतच जवळपास ६० कोटींच्या ठेवीसुद्धा त्यांना परत कराव्या लागतील, परिणामी बँक डबघाईला येईल. त्यामुळे हा नियम बँकेच्या उपविधीत नाही. आम्ही कायदेशीर बाबी तपासून पाहात आहोत, असे शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT