Nagpur ZP
Nagpur ZP Sarkarnama
विदर्भ

ZP : विरोधकांच्या सभात्यागाने मुद्दा निसटला, अन् माजी सभापतींचा जीव भांड्यात पडला !

सरकारनामा ब्यूरो

The issue became popular across the state : जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीने शासकीय निवासस्थानातील फर्निचर घरी नेले होते. येवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर ते त्यांनी नातेवाइकाला दिले. विरोधकांनी हा मुद्दा उचलल्यानंतर राज्यभर हा विषय गाजला. सर्वसाधारण सभेत विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे हा मुद्दा निसटला. त्यामुळे माजी सभापती थोडक्यात बचावल्या आहे.

जिल्हा परिषद सभापतींच्या निवासातील फर्निचर गायब झाल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. यामुळे संबंधित माजी सभापतीसह नागपूर जिल्हा परिषदेची राज्यभर चर्चा झाली. सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता होती. यामुळे संबंधित सभापतींचे कारस्थान समोर येणार होते. परंतु विरोधकांच्या सभात्यागामुळे हा मुद्दा निसटला. त्यामुळे माजी सभापतींचा जीव भांड्यात पडला.

यामुळे काही जण दुखावल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसहित चारही सभापतींना शासकीय निवासस्थान आहेत. माजी सभापतींनी पद जाण्यापूर्वी निवासातील फर्निचर घरी नेले. विरोधी पक्ष नेते आतिश उमरे व शिवसेना (शिंदे गट) (Eknath Shinde) सदस्य संजय झाडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.

शासकीय (Government) फर्निचरही अपुरे पडत असल्याने याची जिल्हाभर (Nagpur) चर्चा झाली. घरी नेलेले फर्निचर सभापतींनी परत आणून दिले. एका महिला सभापतींनी दुसरेच फर्निचर परत केले. परत केलेले फर्निचर व नेलेले फर्निचर यात तफावत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. संबंधित सभापतींनी जवळच्या मंडळीला ते आंदणात दिल्याने दुसरे फर्निचर दिल्याची चर्चा रंगली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फर्निचरची किंमत भरून देण्यासाठी प्रशासनाकडून पत्रव्यवहार करण्यात येणार होता. परंतु सत्तापक्षाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. सर्वसाधारण सभेत हा विषय विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणार होता. पण त्यापूर्वीच विरोधकांनी सभात्याग केला.

मुद्यावर पडदा टाकण्यासाठी सभात्याग ?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित सभापतींकडून विषय न घेण्यासाठी अनेकांना फोन गेले. त्यांनी चूक मान्य करीत फर्निचरची रक्कम भरून देण्याची तयारीही दर्शविली. प्रशासनालाही (Administration) त्याबाबत कळविण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतु विरोधकांनी सभात्याग केला. यामुळे सर्वसाधारण सभेत कोणतेही विषय आले नाहीत.

या मुद्यावर पडदा टाकण्यासाठी विरोधकांकडून सभात्याग करण्याचीही चर्चा होत आहे. माजी सभापतींच्या कारभारावर अनेक जण नाराज होते. त्यामुळे हा विषय सभेत न आल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचीही चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT