Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेची शस्त्रक्रिया कोण करणार? प्रचारात गुंतलेल्या सत्ताधाऱ्यांना वडेट्टीवारांनी सुनावले

Vijay Wadettiwar anger at the rulers over the collapsed health system : राज्यातील पूरस्थितीनंतर साथ आजारांची धोका वाढला आहे. पंरतु राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

Pradeep Pendhare

Mumbai News : पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर सत्ताधाऱ्यांना चांगलेच सुनावले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे महायुती सरकारच्या काळात धिंडवडे निघालेच आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची कसे तीन-तेरा वाजलेत, याचा प्रत्यय आला.

"ही ढासळलेली आरोग्य व्यवस्थेला भाजप महायुती सत्ताधारी आणि भ्रष्टाचारात मुरलेली प्रशासकीय व्यवस्था जबाबदार आहे. बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेची शस्त्रक्रिया करायला सत्ताधारी प्रचारातून वेळ देणार का?", असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

राज्यात मुसळधार पावसानंतर आता साथ आजारांची परिस्थिती उद्भवली आहे. याचबरोबर राज्यातील आरोग्य व्यवस्थेची कोलमडल्याचे चित्र समोर आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर करत राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवरून भाजप (BJP) महायुती सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. गडचिरोलीमधील मुलांनी वडिलांचा जीव वाचवण्यासाठी खाटेची कावड केली. पुरातून, चिखलातून 18 किलोमीटरची पायपीट केली, याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना हाच का विकास, असा सवाल केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका आठवड्यापूर्वी गडचिरोलीमध्ये सरकार योजनांचे उद्घाटन केले. परंतु उद्घाटनाच्या नावाखाली थाटामाटात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करून घेतला. मात्र जिल्ह्यातील ढासळेल्या आरोग्य व्यवस्थेकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. आता जनतेच्या लक्षात आले की, हा फुगवटा आहे". जनता हा फुगवटा विधानसभा निवडणुकीला पूर्ण घालवून टाकणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगत महायुती सरकार चांगलेच सुनावले.

आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा

राज्यात आरोग्य व्यवस्थेचे कसे तीन-तेरा वाजले आहे, याचा पाढाच विजय वडेट्टीवार यांनी वाचला. रुग्णवाहिका नसल्यामुळे बालकाचा मृत्यू झाला. जेसीबीमध्ये गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे बाळांच्या मृत्यूकडे लक्ष वेधले. राज्यात पुरानंतर साथ रोगांची स्थिती उद्भवलीय. आरोग्य यंत्रणा कुठे काम करत आहे हेच कळत नाही.

गडचिरोली हा आदिवासी भाग आहे. तेथील आरोग्य व्यवस्थेवर बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली दौऱ्यावर आल्यानंतर तिथल्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणे गरजेचा होते. परंतु त्यांनी त्याऐवजी सत्तेसाठी प्रचारात गुंतले. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा होण्यामागे महायुतीची भ्रष्ट सत्ता आणि बेजाबाबदार प्रशासकीय व्यवस्था कारणीभूत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT