Vijay Wadettiwar News : सुनेत्रा पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसेच्या नेत्यांनी रविवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांची भेटी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा अर्थखाते मिळावे, अशी त्यांनी मागणी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या भेटीनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लाचारांचा पक्ष म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, 'अर्थखातं मिळावं ही त्यांची मागणी खूप दिवसापासून आहे. मध्ये मध्ये कोण उठतो आणि जाऊन भेटतो, मागणी करतो.अरे ते खाते तुमच्याकडे होतं तर ते तुम्हाला मिळायला पाहिजे. पण येवढी लाचारी मी पाहिलीच नाही.'
पुढे ते म्हणाले, 'हा पक्ष लाचाराचा पक्ष झाला आहे. आणि यांना भीक मागितल्या सारखं हातात कटोरे घेऊन भाजपच्या हायकमांडच्या पुढे या लोकांना उभं राहावं लागतं. हे या पक्षाचं दुर्देव आहे असं मी मानतो.'
अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवले. दरम्यान, हे खाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, आता थेट गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अर्थखाते पुन्हा मिळावे म्हणून राष्ट्रवादी आक्रमक असल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवास्थानी आज बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहे. विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत झालेला पराभव तसेच आगामी काळातील रणनीती विषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाह यांची भेट दिल्लीत घेतली असताना स्वतः सुनेत्रा पवार,पार्थ उपस्थित नव्हते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.