Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प मंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अर्थसंकल्पातून मोठं पॅकेज जाहीर झाले.
महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा असून, याबदल्यात महाराष्ट्राला काय, असा सवाल विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी करत 'ठेंगा!', असे उत्तर देखील दिले आहे. देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? असा देखील वडेट्टीवार यांनी प्रश्न केला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून अर्थसंकल्पात या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. आंध्र प्रदेशासाठी 15 हजार कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले, तर बिहारमधील रस्ते प्रकल्प उभारणीसाठी तब्बल 26 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली.
या अर्थसंकल्पात मोदी सरकारने तिसऱ्या टर्मसाठी पाठिंबा देणाऱ्या आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेतली. परंतु महाराष्ट्राला काय, असा सवाल आता होऊ लागला आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यावरून घेरलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळाले, ठेंगा! असे म्हणत महायुती सरकारला डिवचले आहे. देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत, भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली, तर गुजरात किंवा इतर राज्य! महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.