ShivSangram  Sarkarnama
महाराष्ट्र

Vinayak Mete's Party : मोठी बातमी : विनायक मेटेंची संघटना अजितदादा गटासोबत; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार !

Shivsangram Merged In NCP : पक्षाचे आमदार वाढविण्याचा निर्धार उदयकुमार आहेरांची ग्वाही...

Chetan Zadpe

Maharashtra News : शिवसंग्राम संघटनेच्या राज्यभरातल्या बावीस जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांसह नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केलेले उदयकुमार आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत प्रवेश केलेल्या चार पदाधिकाऱ्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनाच्या तब्बल वर्षभरानंतर उदयकुमार आहेर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील सुमारे 22 जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवड्यात प्रवेश केला होता. यामध्ये नाशिकसह पुणे, लातूर, अमरावती, अकोला, वर्धा, बुलडाणा, नागपूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, वर्धा, वाशीम, बीड आदी जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

या पदाधिकाऱ्यांमधून अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उदयकुमार आहेर यांना राज्याच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवतानाच त्यांच्यासोबत आर्किटेक्ट वैशालीताई जवंजाळ यांना प्रदेश महिला सरचिटणीस, तर नंदुरबारचे संतोषराव मराठे आणि बुलडाणा जिल्ह्यातील पंजाबराव देशमुख यांना प्रदेश चिटणीसपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे.

येणाऱ्या काळात मराठा आरक्षण, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक या दोन प्रमुख विषयांसोबतच कसमादे व खानदेशसाठी उपयुक्त असणाऱ्या वरदान ठरणाऱ्या मांजरपाडा दोन या प्रकल्पांसाठी तसेच शेतकरी कष्टकरी युवक महिला अल्पसंख्याक यांच्यासाठी काम करून, पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसविण्यासाठी पक्षाचे आमदार वाढविण्याचा निर्धार उदयकुमार आहेर यांच्यासह नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्यालयात बोलताना व्यक्त केला.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, महिला अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, बाप्पा सावंत आदींनी अभिनंदन केले आहे

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT