Pune News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत. त्यामुळे आता हिंदूचे सरकार सत्तेत आले असून आमचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे. यामुळे हिरव्या सापांनो असे म्हणत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री असलेल्या नितेश राणे यांनी अनेकदा एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं आहे. त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्याची आणि भाषणाची गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच शिवसेना पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी अॅड. असीम सरोदे यांच्याकडून नितेश राणे यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे कोकणात खळबळ उडाली आहे.
मंत्री तथा भाजप नेते नितेश राणे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करताना वारंवार दिसत आहेत. तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये कुठलाही सरकारचा निधी असेल तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल, बाकी कोणालाही भेटणार नाही, असे म्हटलं होते. तर जिथे जिथे उबाठा आणि महाविकास आघाडीचे सरपंच किंवा पदाधिकारी असतील त्या गावांमध्ये एक रुपयाचांही निधी देणार नाही. गावाचा विकास करायचा असेल तर महायुतीमध्ये प्रवेश करा. नाहीतर विकास होणार नाही, असा इशाराच होता.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
पण असा इशारा असो किंवा एका एखाद्या समाजाला टार्गेट करणे असो यावरून ते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. नितेश राणेंच्या त्यांच्या वक्तव्यावरून आता कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये मंत्रीपदाची शपथ संविधानाच्या कलम 164(3) नुसार घेताना ज्या संविधानिक कर्तव्याचे पालन करावे लागते. त्या संविधानिक कर्तव्याचे पालन ते करताना दिसत नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. तर मंत्रीपदावरील व्यक्तीने असे भेदभाव व विषमता, द्वेषपूर्ण विधान करणे घटनाबाह्य असल्यानेच नोटीस पाठवल्याचे विनायक राऊत यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
असीम सरोदे यांनी, कोणाबद्दलही आकस, द्वेषभावना न ठेवता, विशेष प्रेम न दाखवता काम करण्याची बांधिलकी मंत्र्याची असते. तशी शपथ देखील नितेश राणे यांनी मंत्री म्हणून घेतली आहे. पण आता त्यांना संविधानिक शपथेचा विसर पडला का? असा सवाल नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
नितेश राणे चुकीच्या प्रशासनाच्या दिशेने लोकशाहीला नेत आहेत आणि चुकीचा पायंडा महाराष्ट्राच्या राजकरणात निर्माण करत आहेत. म्हणून कायदेशीर नोटिस पाठवीत असल्याचेही माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखी नितेश राणे यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी असेच वक्तव्य केल्याने चर्चेत आले होते. त्यांनी सरपंचांच्या मेळाव्यात, जे भारतीय जनता पक्षाचे नाहीत, जे नारायण राणेंना मदत करणार नाहीत, ज्या गावात लिड मिळणार नाही, त्या गावांना कोणताही विकास निधी देणार नाही असे म्हटलं होतं.
पण आता नितेश राणे यांनी, राज्यपालांनी राज्यघटनेच्या कलम 164(3) नुसार दिलेल्या दिलेल्या मंत्रीपदाच्या शपथेला तिलांजली वाहण्याचे काम नितेश राणे करत आहेत. ते संविधान विरोधी वागत असून निधीवरून महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाला धमकी देत आहेत. ते विषमता निर्माण करण्याचे काम करत असून त्यांना मंत्री पदावरून काढून टाका असे म्हटले होते.
तसेच भाजपच्या विकसित भारत घोषणेमध्ये केवळ भाजपचे सदस्यच आहेत का? एकीकडे मुंबईतील आणि दिल्लीतील ‘बॉस’ ‘सबका साथ सबका विकास’ अशा घोषणा देतात. पण आता हीच घोषणा समाजामध्ये द्वेष पसरवून पाहतेय का? असा देखील सवाल या नोटीसीतून विचारण्यात आला आहे. यापूर्वीही महाराष्ट्रामध्ये सर्वत्र एकात्मता व बंधुभाव याविरोधात वातावरण निर्माण हिंसकता पसरविण्याबद्दल नितेश राणे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याबाबतचा उल्लेखही नोटीस मध्ये करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.