Mumbai : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडलेल्या विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्यांदा काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदाची संधी दिली आहे. यापूर्वीही २०१९ साली लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली होती. (Vijay Wadettiwar News) चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ च्या जून महिन्यात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले होते. त्यावेळी वडेट्टीवारांकडे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्याने संधी मिळाली होती.
वडेट्टीवारांकडे अगदी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडवरच पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाच्या निमित्तानं महत्त्वाचं पद आले आहे. (Congress) लोकसभा निवडणुकीला अगदी सात-आठ महिन्यांचा, तर विधानसभा निवडणुकीला साधारण वर्षभराचा अवधी बाकी आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार असताना, १९९६ ते १९९८ दरम्यान (Vijay Wadettiwar) वडेट्टीवारांकडे महाराष्ट्र वन विकास महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं. या पदाला राज्यमंत्री दर्जा होता.
वडेट्टीवारांच्या राजकीय कारकीर्दीतलं हे पहिलं राज्यव्यापी पद होत. १९९८ साली त्यांना शिवसेनेनं विधानपरिषदेची आमदारकी दिली आणि पहिल्यांदा ते विधिमंडळाची पायरी चढले. (Maharashtra) २००४ साली ते पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले. चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली आणि आमदार झाले. याच काळात म्हणजे २००५ साली शिवसेनेत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी बंड केलं.
नारायण राणेंच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्या ११ आमदारांमध्ये विजय वडेट्टीवार हेही होते. पुढे नारायण राणेंनी प्रवेश करताच काँग्रेसमध्ये महसूलमंत्री पद सांभाळलं. त्यांच्या समर्थकांमधील विजय वडेट्टीवारांना मंत्रिपदासाठी तीन वर्षे वाट बघावी लागली. २००८ साली विजय वडेट्टीवारांना जलसंपदा, आदिवासी विकास आणि पर्यावरण वने या खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं. त्यानंतर २००९ साली जलसंपदा, ऊर्जा, वित्त व नियोजन आणि संसदीय कार्य या खात्यांचं राज्यमंत्रिपद वडेट्टीवारांकडे आले.
२०१४ साली काँग्रेसची सत्ता गेली. त्यानंतर नारायण राणे भाजपमध्ये गेले. मात्र, वडेट्टीवार काँग्रेससोबतच राहिले. विधानसभेत त्यांच्याकडे उपनेतेपद आलं. पुढे राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेतेपदी असतानाच, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं, रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. तर आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आलंय.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.