CM Eknath Shinde News Sarkarnama
महाराष्ट्र

CM Eknath Shinde On Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये...

Jalna Maratha Protest : जरंगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे, अशी विनंती त्यांना केली जात होती. मात्र, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या पोलिस लाठी हल्लानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde News) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, समाजाने संयम राखावा, कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

अंतरवाली सराटी येथील घटनेचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटत आहेत. सगळ्या राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. (Maratha Reservation) आज दिवसभर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची अंतरवाली सराटीत गर्दी होती. परंतु (Eknath Shinde) मुख्यमंत्री या घटनेवर बोलले नव्हते. अखेर त्यांनी या विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट करतांना मराठा समाजाला आवाहनही केले आहे.

मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. (Maharashtra) आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये. जालना जिल्ह्यातील आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

या आंदोलनाचे नेते जरंगे पाटील यांच्याशी मी संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही सुरु होती. परंतु, त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. जरंगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची मी विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यांच्या जीवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी आणि एसपी तिथे गेले. जरंगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे, अशी विनंती त्यांना केली जात होती. मात्र, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. नागरिकांनी आणि मराठा समाज बांधवांनी शांतता राखावी. माझी मराठा समाजाला, आंदोलकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. मराठा समाजाला मी आवाहन करतो की, त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. हे शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT