bhagat singh koshyari- Raj Thackeray
bhagat singh koshyari- Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Aurangabad : काय हा योगायोग ? राज ठाकरे थांबले त्याच हाॅटेलात राज्यपालही आले...

सरकारनामा ब्युरो

औंरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उद्याच्या सभेआधी अनेक नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. (Raj Thackeray) राज ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते ज्या रामा इंटरनॅशनल हाॅटेलमध्ये मुक्कामी असणार आहे, त्याच हाॅटेलात राज्यपाल भगतिसंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांचे काही वेळापुर्वीच आगमन झाले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांचे चिरंजवीर वरूण यांचा नुकताच दिल्लीत विवाह पार पडला. त्या प्रित्यर्थ आज सायंकाळी औरंगाबादेत (Aurangabad) स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभासाठी आपण आलो असल्याचे सांगत राज्यपालांनी प्रसार माध्यमांशी अधिक बोलणे टाळले.

परंतु हा निव्वळ योगायोग आहे की मग ठरवून केलेला कार्यक्रम? याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेत गुडी पाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्याच्या विषयाला हात घातला. ३ मे पर्यंत भोंगे हटवा नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, असा अल्टीमेटम देखील महाविकास आघाडी सरकारला दिला. राज ठाकरे यांच्या भूमिकेचे भाजपच्या नेत्यांनी समर्थन केले.

त्यानंतर राज ठाकरे यांना भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला. त्यांनतर राज ठाकरे यांच्या औंरंगाबादेतील आगमनापुर्वीच अनेक नाट्यमय घटनाघडामोडी घडतांना दिसत आहेत. भाजपचे शहरअध्यक्ष व मराठवाडा संघटनमंत्री यांनी काही पदाधिकाऱ्यांसह मनसेचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांची रामा हाॅटेलात जाऊन भेट घेतली होती.

कराड यांच्या मुलाच्या स्वागत समारोहाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी आपण गेलो होतो, असे स्पष्टीकरण संजय केणेकर यांनी दिले होते. या भेटीची चर्चा थांबत नाही तोच, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील रामा हाॅटेलात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे ते येण्याआधी काही मिनिटे आधीच राज ठाकरे यांचे या हाॅटेलात आगमन झाले होते.

आता विरोधकांचा भाजपकडून राज यांच्या सभेला पाठिंबा असा आरोप होत असतांना भाजप नेत्यांकडून सुरू असलेल्या भेटीगाठी आणि राज्यपालांच्या त्याच हाॅटेलात येणे हा योगायोग कसा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकंदरित राज ठाकरे यांच्या सभेपुर्वी होणाऱ्या या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारण ढवळून निघाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT