<div class="paragraphs"><p>Nitin Raut-Devendra Fadnavis&nbsp;</p></div>

Nitin Raut-Devendra Fadnavis 

 

Sarkarnama

महाराष्ट्र

नितीन राऊत कोण? त्यांना कशासाठी उत्तर देणार? : फडणवीसांनी उडवली खिल्ली

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे. याच कारणावरून मोदींनी दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे. महाराष्ट्रामध्येही हे चित्र पाहायला मिळत आहे. मोदी यांच्या सुरक्षेच्या त्रुटीवरुन होत असलेल्या आरोपांवर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी टीका केली होती. मात्र त्यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या शैलीत खिल्ली उडवली आहे.

मोदी यांच्या सुरक्षेच्या त्रुटीवरुन भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयांसमोर आंदोलन सुरु केले आहे. त्यावर बोलताना नितीन राऊत म्हणाले होते, भाजपचे कार्यकर्ते आमच्या कार्यालयासमोर आंदोलन करत असतील तर त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर देखील आंदोलन करायला हवे, कारण देश भाजपमुळेच देशोधडलीला लागला आहे. राऊत यांच्या टीकेबद्दल देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी "नितीन राऊत कोण आहेत? ते काय देशाचे नेते आहेत का? रोज काहीही बोलतली, त्यांना थोडी उत्तर देणार? असे म्हणत राऊतांची खिल्ली उडवली.

देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले, काल पंजाबमध्ये जी घटना घडली ती देशतली गंभीर घटना आहे. या देशाने भारतात अनेकदा अनेक सरकारे बघितली आहेत, पण देशाच्या पंतप्रधान यांच्या सुरक्षेबाबत असा खेळ कधी पाहिला नाही. तसेच कालची घटना ही विचारपूर्वक होती, असाही आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, पंतप्रधान यांच्या एसओपी स्ट्रॉंग असतात त्या पाळाव्या लागतात. त्याची पुस्तिका दौऱ्यावेळी त्या राज्याला दिलेली असते. त्यामुळे राज्याला ते माहित नाही असे होऊच शकत नाही.

काल जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी देण्यात आली. आंदोलक काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांना थांबवण्यात आले नाही, असाही आरोप फडणवीस यांनी केला. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान यांचा ताफा १५ ते २० मिनीट अडलेला होता. पंतप्रधान यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम तिथल्या सरकारने केले. यानंतर मुख्यमंत्री फोनवर येत नाही त्यामुळे काहींना काही शिजल होते. त्यामुळे राष्ट्रपतींना आमची विनंती आहे की जे घडले आहे ते देशाने गंभीर घेतले पाहिजे. पंतप्रधान यांच्या सुरक्षेमधील हलगर्जीपणा ही देशासाठी शरमेची बाब आहे. काँग्रेसचे नेते बेशर्मिने वक्तव्य करत आहेत. ही निर्लज्जता आहे, अशीही प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाबाबत जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र यापलिकडे जावून पंतप्रधान मोदी जनतेचा आशीर्वाद घेऊन आले आहेत. हा आशीर्वाद वाढत आहे. त्यामुळे मोदींच्या केसालाही धक्का लागू शकत नाही, भारताची जनता यांना जागा दाखल्याशिवाय राहणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT