Maharashtra Political News : मराठा आरक्षणविषयक सह्याद्री अतिथिगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख तथा माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न बोलावल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. (Maratha Reservation News) यात आता एमआयएम पक्षाचीही भर पडली आहे. खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.
आजच्या सर्वपक्षीय बैठकीत (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis) एमआयएम पक्षाला का बोलावले नाही? असा सवाल इम्तियाज यांनी `एक्स`वर पोस्ट करत केला आहे. इम्तियाज जलील यांनी सर्वपक्षीय बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेले पक्ष व त्यांच्या नेत्यांची यादीच पोस्ट केली आहे. या यादीमध्ये एमआयएम पक्ष दिसत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने, रास्ता रोको, नेत्यांना बंदी, घेराव, राजीनाम्यांची मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. (Imtiaz Jaleel) एवढेच नाही तर सरकारी कार्यालये, अधिकारी, त्यांनी वाहने आणि लोकप्रतिनिधींची घरे पेटवण्याच्या हिसंक घटनादेखील राज्यात घडल्या. या पार्श्वभूमीवर काल मंत्रीमंडळाची बैठक पार पडली, आणि आज मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्यातील छोट्या मोठ्या अशा ३३ पक्षांचे नेते उपस्थितीत होते. परंतु ज्या पक्षाचा महाराष्ट्रात एक खासदार, दोन आमदार आहेत, त्या पक्षाला मात्र निमंत्रित करण्यात आले नाही. या बैठकीत झालेले निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. त्यावर इम्तियाज जलील यांनी आपल्या पक्षाला या सर्वपक्षीय बैठकीला का बोलावले नाही? अशी विचारणा करत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत.
कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून, यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.