Election Commission officials reviewing arrangements for the upcoming two-phase Zilla Parishad elections. Sarkarnama
महाराष्ट्र

ZP Elections : कोर्टाच्या निर्णयाने टेन्शन वाढले, जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात? निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू

Election Commission Court : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे. त्यामुळे दोन टप्प्यात निवडणूक घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाने सुरू केल्याची माहिती आहे.

Roshan More

ZP Elections News : जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये 50 टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिली नसली तरी निवडणुक झालेल्या ठिकाणी कोर्ट अंतिम निर्णय घेईल, असे सांगत जानेवारी महिन्यात पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. त्यामुळे जेथे निवडणूक होईल ती निवडणूक रद्द होण्याची भीती कायम आहे.

32 जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे. मात्र, 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचे राज्य सरकारने कोर्टात कबूल केले आहे. कोर्टाच्या जानेवारीमधील निकालाचा परिणाम या निवडणुकीवर होऊ नये म्हणून दोन टप्प्यात निवडणूक घेण्याचा विचार निवडणूक आयोग करत आहे. संदर्भात 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

15 जिल्हा परिषदांमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजे डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे. या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलेली नाही.त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाच्या या निवडणुकीवर परिणाम होणार नाही.

21 जानेवारीनंतर निवडणूक

दुसऱ्या टप्प्यात 21 जानेवारीनंतर 17 जिल्हा परिषदांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांबाबत कोर्ट सुनावणी घेणार आहे. या सुनावणीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या संदर्भात कोर्ट अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT