Pune Zilla Parishad  sarkarnama
महाराष्ट्र

ZP News : जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढली, तब्बल 201..., ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी!

Zilla Parishad Nominated Members : जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येत वाढ होणार आहे. ही वाढ निवडणुकीतून नाही तर स्वीकृत सदस्य पद्धतीने होणार आहे. या विषयी ग्रामविकास विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

Roshan More

ZP Politics : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सदस्य संख्या वाढणार आहे. कारण स्वीकृत सदस्यांच्या म्हणजेच नामनिर्देशीत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या अधिसूचनेनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये मिळून तब्बल 1 हजार सदस्यांची भर पडणार आहे.

विधासभेत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचाय समिती विधेयक (दुरुस्ती) 2026 विधेयक पास झाले होते. आता ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेने सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा पाच सदस्य नियुक्त होणार आहेत. तर पंचायत समितीत एकूण सदस्य संख्येच्या 20% किंवा एक सदस्य नियुक्तीला परवानगी आहे.

201 नवे जिल्हा परिषद सदस्य

राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये निर्वाचित तब्बल 2 हजार 210 सदस्य आहेत. या सदस्यांसोबतच आता नवीन 201 स्वीकृत सदस्यांनी निवड होणार आहे. तर, पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या पाहता राज्यभर 800 पेक्षा अधिक पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य होणार आहेत.

तज्ज्ञ सदस्यांना संधी

राज्यसरकारकडून नेत्यांचे राजकीय पुर्नवसन करण्यासाठी हे प्रयत्न केल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र, यामध्ये केवळ राजकीय व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळणार असे नाही तर वकील, डाॅक्टर, समाजसेवक समाजातील तज्ज्ञ व्यक्तिंना संधी मिळणार आहे.

मतदानाचा अधिकार नाही

स्वीकृत सदस्यांना कामकाजामध्ये मतदान झाले असता मतदानाचा अधिकार नाही. त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अध्यक्षपद, सभापतीपदाची निवडणूक लढणार येणार नाही. जिल्हा परिषदेच्या कार्यकाळा इतकाच यांचा देखील कार्यकाळ असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT