Jaykumar Gore in Assembly Sarkarnama
महाराष्ट्र

ZP Teachers news : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; ZP शाळांमधील बदल्यांसाठीचे सर्व GR रद्द करण्याची सरकारची तयारी, मंत्र्यांची विधानसभेत माहिती

ZP teachers transfer GR : बिंदूनामावलीची प्रक्रियाही पूर्ण झाली असून त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षात जून महिन्याच्या आधी बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.

Rajanand More

Maharashtra government teacher transfers : राज्यांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, त्यांच्या बदल्या, पुरेशी पटसंख्या नसल्याने बंद पडणाऱ्या शाळा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन असे मुद्दे सातत्याने चर्चेत असतात. त्यावरून अनेकदा शिक्षक संघटनांनी आंदोलने केली आहे. आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही या मुद्दयावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिक्षकांच्या बदल्यांबाबत अत्यंत महत्वाची माहिती दिली.

भाजपचे नागपुरातील आमदार मोहन मते यांनी झेडपी शाळांमधील शिक्षकांची बिंदूनामावली, बदल्या, समयोजन आणि बंद पडणाऱ्या शाळांबाबतचा मुद्दा मांडला. त्यावर गोरे यांनी ऑक्टोबर अखेरपर्यंत सुमारे ६६ हजार शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच पटसंख्या कमी असल्याने एकही शाळा बंद पडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बिंदूनामावलीची प्रक्रियाही पूर्ण झाली असून त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षात जून महिन्याच्या आधी बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही गोरे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या उत्तरानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गोरेंवर निशाणा साधला. मंत्र्यांचे उत्तर गोलमोल असल्याचा निशाणा त्यांनी साधला.

आज शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या आयुष्याशी तुम्ही खेळत आहात का, नवीन धोरणे आणत असताना जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायच्या, हा तुमचा निर्णय झालाय का, असा सवाल वडेट्टीवारांनी केला. हा खेळखंडोबा सुरू आहे. मंत्र्यांनी किती जागा रिक्त आहेत, कधी जागा भरणार याचे मुद्देसूद उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी केली.

रिक्त पदे किती?

पवित्र पोर्टलचे नुसते नाव पवित्र आहे, काम मात्र अपवित्र सुरू असल्याचा टोलाही वडेट्टीवारांनी लगावला. त्यावर उत्तर देताना गोरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण १ लाख ९० हजरा ९०३ पदसंख्या आहे. त्यापैकी १ लाख ७६ हजार ६१४ कार्यरत आहेत. सुमारे १५ पदे महाराष्ट्रात रिक्त आहेत.

बदल्यांसाठी नवे धोरण

शिक्षकांच्या बदल्यांबाबत अनेकदा शिक्षक संघटना आल्या की बैठका होतात, जीआर होतो, शुध्दीपत्रक होते, जीआर होतो, शुध्दीपत्रक होते. आता एवढे जीआर आणि शुध्दीपत्रक झाले आहेत की हे सगळे जीआर निरस्त करण्याची वेळ आली आहे. नव्याने बदली धोरण बनवून शिक्षकांच्या बदल्या पार पाडण्याची आवश्यकता आहे. त्याअनुषंगाने आम्ही विचार करत असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT