महिला

गरिबांसोबत दिवाळी साजरी करणाऱ्या नवनीत राणा

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : चित्रपटातील अभिनेत्रींची दिवाळी साजरी करण्याचा बाज काही औरच असतो. परंतु दक्षिणेतील चित्रपटात आपल्या अभिनयाने एक वेगळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या नवनीत कौर राणा यांची दिवाळी गरिबांसोबत साजरी होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असलेल्या नवनीत राणा गेल्या 10 वर्षांपासून गरिबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबवित आहेत.

आमदार रवि राणा गेल्या 10 वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी गरिबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबविणे सुरू केले. हा उपक्रम नवनीत राणा यांनाही चांगलाच भावला व त्यांनी या उपक्रमाला मोठे स्वरुप दिले. अभिनेत्री असल्याचा कोणताही बडेजाव न करता नवनीत राणा गरिबांना दिवाळीत मदत करतात. गरिबांना साखर व धान्य, नवे कपडे व दिवाळीसाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्य वाटप करतात. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाने आता राणा कुटुंबियाला जिल्ह्यात वेगळी ओळख दिली आहे.

'सरकारनामा'शी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, लग्न होऊन अमरावती शहरात आल्यानंतरच मला या उपक्रमाची माहिती मिळाली. आपल्या घरी गोडधोड व्हावे, असे प्रत्येक कुटुंबाला वाटते, मुलांना नवे कपडे मिळावे, नातेवाईकांना फराळ द्यावा, असे वाटते. परंतु, प्रत्येकाला हे शक्‍य होत नाही. आर्थिक विवंचनेने दिवाळीही साजरी करू न शकणारे अनेक कुटुंबे असतात. या कुटुंबांना मदत करण्यासाठी हा उपक्रम आहे. यातून आम्ही काही भव्यदिव्य करीत नाही. परंतु एक समाधान मात्र मला मिळते, की गरिबांच्या घरात दिवा माझ्या प्रयत्नाने जळू लागला. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हिच माझी दिवाळी भेट आहे. आता हा दरवर्षीचा उपक्रम झाला आहे. आमची दिवाळी अशीच गरिबांसोबत साजरी होते. गरिबांच्या घरातही दिवाळीच्या दिवसांमध्ये दिवा जळावा, अशीच मी नेहमी कामना करते.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT