sangita-Thombre33
sangita-Thombre33 
महिला

निवडणुका येताच आमदार संगीता ठोंबरेंचे जनकल्याण अभियान 

सरकारनामा

केज : शासनाच्या अनेक योजना असतात पण सामान्यांना कार्यालयांत खेटे मारुनही योजना मिळत नाहीत. मात्र, या योजना सामान्यांना त्यांच्या घरपोच देण्यासाठी भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनी आमदार जनकल्याण अभियान राबविले. याचा समारोप बुधवारी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात लाभार्थींना शासकीय योजनांच्या धनादेशाचेही वितरण करण्यात आले.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त ता. २६ जुलै पासून केज मतदार संघात आमदार संगीता ठोंबरे यांनी हे अभियान सुरु केले होते. शासनाच्या सामान्यांसाठी अनेक योजना असतात. परंतु, योजनांचा लाभ घेताना लाभार्थींना अनेक खास्ता खाव्या लागतात. त्यामुळे शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना थेट गावात नेऊन त्या योजनांचा लाभ देण्याच्या हेतूने हे अभियान हाती घेण्यात आले होते. 

दरम्यान, या अभियानातून गरिबांना मोफत उपचाराचे आयुष्यमान कार्ड, प्रवास सवलत योजनेचे स्मार्ट कार्ड, शेत जमिनींच्या प्रलंबीत फेर नोंदी, बांधकाम मजूरांच्या नोंदी, मराठा समाजाला आरक्षण एसईबीसी प्रमाणपत्र, उज्वला गॅस, रेशन कार्ड आदी विविध शासकीय येाजना त्यांनी यंत्रणेला नेऊन थेट लाभार्थींना घरपोच केले.

 मागचे पंधरा दिवस मतदार संघात संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांनी अनेक गावांत जाऊन अभियानांतर्गत मेळावे घेऊन लाभार्थी निवडले. बुधवारी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत लाभार्थींचा मेळावा घेऊन प्रातिनिधीक स्वरुपात या योजनांचे लाभ देण्यात आले.  दरम्यान, या अभियानामुळे हजारो सामान्यांना लाभ देता आल्याचे समाधान असल्याचे आमदार संगीता ठोंबरे म्हणाल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT