bhawana-gavali
bhawana-gavali 
महिला

मंत्रिपदाने दिली हुलकावणी ,खासदार भावना गवळी नाराज !

राजकुमार भीतकर

यवतमाळ : केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची वर्णी लागेल असा विश्‍वास शिवसैनिकांसह जिल्ह्यातील जनतेला होता. त्या मंत्रिपदाच्या दावेदार असल्यानेच त्यांना जनतेने प्रचंड मतांनी निवडूनही दिले.

परंतु, केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या नावाचा समावेश न झाल्यामुळे भावना गवळी नाराज असल्याची चर्चा आहे. अखेरच्या क्षणी गवळी यांच्याऐवजी कॅबिनेट मंत्री म्हणून अरविंद सावंत यांचे नाव समोर आले. त्यामुळे खासदार गवळी नाराज असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

खासदार भावना गवळी यांनी सलग पाचव्यांदा लोकसभेत प्रवेश केला. दरवेळी त्यांचे मताधिक्‍य वाढतच गेले आहे. माणिकराव ठाकरे आणि कॉंग्रेसच्या अन्य दिग्गज नेत्यांना लोकसभेला पराभूत करणाऱ्या नेत्यामध्ये त्यांचे नाव आहे.

विदर्भातील एकमेव महिला नेत्या असल्याने यंदा केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागेल अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. शिवसेनेत ज्या नावाची चर्चा होती, त्यात भावना गवळीचे नाव आघाडीवर होते. 

त्यामुळे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातील शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. यंदा कॅबिनेटमध्ये गवळींना संधी मिळेल अशीच शक्‍यता होती. परंतु, आज (ता.30) सकाळी गवळी यांच्याऐवजी अरविंद सावंत यांचे नाव निश्‍चित झाले.

कॅबिनेट मंत्री म्हणून संधी न मिळाल्याने गवळी नाराज असल्याचे दिसून आले. शिवसैनिकांमध्येही काही प्रमाणात नाराजीचा सुरू दिसून आला. यासंदर्भात खासदार भावना गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT