DCP-Vaishali-Kadukar
DCP-Vaishali-Kadukar 
महिला

सोलापुरात पोलीस उपायुक्तपदी डॉ. वैशाली कडूकर

सरकारनामा

सोलापूर  : सोलापूर पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त पदी कोल्हापूरहून डॉ. वैशाली कडूकर या बदलून येणार आहेत.

श्रीमती वैशाली कडूकर या सध्या कोल्हापुरात नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. गृहविभागाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

 डॉ. कडूकर यांची सोलापूर पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोल्हापुरात पी.आर.पाटील हे येणार आहेत.

पोलीस उपायुक्त विजय मगर यांच्या बदलीनंतर सोलापूर पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय उपायुक्त हे पद रिक्त आहे. श्रीमती कडुकर यांच्याकडे मुख्यालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT