Praniti-Shinde.jpg
Praniti-Shinde.jpg 
महिला

आजही महिला वरिष्ठ पदावर गेल्याचे  पुरुषांना आवडत नाही : आ .प्रणिती शिंदे 

सरकारनामा

नागपूर  : आज राजकारणात युवकांना मोठी संधी आहे.राजकारणात येऊन समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद युवकांमध्ये आहे .  त्यासाठी त्यांनी राजकारणात यावे, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

 राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळीचे योगदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

आमदार श्रीमती शिंदे म्हणाल्या, राजकारणात येण्याअगोदर 2004 साली जाई-जुई संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करण्यास सुरुवात केली.  या संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला. समाजकारणासाठीच राजकारणात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.

आजही महिला वरिष्ठ पदावर गेलेल्या पुरुषांना आवडत नाही.  महिलांविषयी युवकांनी आदर ठेवला पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्याशिवाय महिलांवर होणारे अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी अनेक कायदे आहेत पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन स्त्रियांबद्दल असलेली समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

युवकांमध्ये संवाद खूप महत्वाचा असून यामधून खूप काही शिकता येऊ शकते. महिलांना आरक्षण दिले गेले आहे. राजकारणात येण्यासाठी अनेक पक्ष आहेत. या पक्षांच्या माध्यमातून राजकारणात येऊ शकतात. याविषयी युवकांनी मानसिकता बदलायला हवी, असेही त्या शेवटी म्हणाल्या.

 यावेळी विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, अवर सचिव सुनील झोरे तसेच विविध विद्यापीठांचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT