medha gadgil.jpg
medha gadgil.jpg 
महिला

फडणवीस सरकारच्या काळात मुख्य सचिवपद हुकलेल्या गाडगीळ यांची ‘मॅट’वर नियुक्ती

सरकारनामा ब्यूरो

पुणे : क्षमता आणि ज्येष्ठता असतानाही केवळ राजकीय कारणाने राज्याच्या मुख्य सचिवपदाची संधी दोनदा हुकलेल्या निवृत्त सनदी आधिकारी मेधा गाडगीळ यांची ‘मॅट’ वर नियुक्ती झाली आहे. १९८३ च्या बॅचच्या ‘आयएएस’अधिकारी श्रीमती गाडगीळ यांची ‘मॅट’च्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणावर सदस्य (प्रशासन) या पदावर नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे.Gadgil, who lost his post as Chief Secretary during the Fadnavis government, has been appointed to the MAT 

२९ वर्षानंतर एका महिला अधिकाऱ्यास हा बहुमान मिळत आहे. मॅटच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या उपस्थितीत नुकतीच श्रीमती मेधा गाडगीळ यांनी सुत्रे स्वीकारली. मेधा गाडगीळ यांनी आपल्या ३६ वर्षाच्या सेवेत सहाय्यक जिल्हाधिकारी ठाणे, जिल्हाधिकारी अहमदनगर, सहसंचालक उद्योग, संचालक हाफकीन बायो., अप्पर मुख्य सचिव गृह (अपिल) व अवर मुख्य सचिव वैद्यकिय शिक्षण यासारख्या विविध पदांवर काम केले आहे.

गाडगीळ या सेवेत असताना गेल्या पाच वर्षात ज्येष्ठतेनुसार मुख्य सचिव होण्याची संधी होती. मात्र, त्यावेळी राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. त्यामुळे गाडगीळ यांची ही संधी हुकली, असे सांगण्यात येते. गाडगीळ यांची कौटुंबिक पाश्‍र्वभूमी राजकीय आहे. माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या त्या स्नुषा तर कॉंग्रेसचे माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या पत्नी आहेत. त्यांची ही कौटुंबिक राजकीय पाश्‍र्वभूमी त्यांच्या मुख्यसचिव होण्यास अडचणीची ठरल्याचे त्यावेळी बोलले जात होते. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत त्यावेळी गाडगीळ यांनी बोलावे, असे त्यांना अनेकांनी सुचविले होते. मात्र, ज्या पदावर सरकारकडून नियुक्ती होईल त्या पदावर काम करण्याची वृत्ती असल्याने त्यांनी याबाबत कुठेही तक्रार केलेली नव्हती.

फडणवीस सरकारच्या काळात गाडगीळ यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली असती तर त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरल्या असत्या. शिवाय मुख्य सचिव होणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला आधिकारीदेखील ठरल्या असत्या. मॅट हे राज्याच्या प्रशासकीय सेवेतील आधिकाऱ्यांचे प्रशासकीय व तत्सम वाद सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेले न्यायाधीकरण आहे.

हेही वाचा : मेधा गाडगीळांच्या नावावर फुली;मुख्य सचिव होण्याची संधी हुकली www.sarkarnama.in/medha-gadgil-couldnt-became-chief-secretary-again-37180

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT