bordikar
bordikar 
महिला

हॉलीवूडचे चित्रपट पाहणार; नागरीकांनीही घरीच बसावे : मेघना बोर्डीकर #janatakacurfew

गणेश पांडे

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.22) देशात जनता कर्फ्यू लागू केला आहे. हा निर्णय देशातील नागरीकांच्या भल्यासाठी असून मीही रविवारी माझ्या कुटूंबासोबत घरीच राहून हॉलीवूडच्या मुव्हीज पाहणार आहे. नेटफील्क्सवरील मॅडम सेक्रेटरी ही सिरिअल पाहणार आहे, असे जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर वेगवेगळे उपया योजना आखल्या जात आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे. या आवाहानाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा. कारण हा निर्णय देशातील प्रत्येक नागरींकाच्या भल्यासाठी आहे. लोकांनी एकत्र येऊन गर्दी करू नये. एकमेकांच्या संपर्कात राहू नये. गरज पडल्यास फोनद्वारे किंवा एसएमएसद्वारे विचारपूस करावी. गप्पा माराव्यात, असे आवाहन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.

आपण स्वतःही मतदारसंघातील घरात पूर्ण  कुटुंबासोबत असणार आहे. मला हाॅलीवूडच्या मुव्हीज खूप आवडतात. त्या पाहणार आहे. नेटफिल्क्सवरील मॅडम सेक्रेटरी ही सिरीयल देखील पाहणार आहे. माझ्या बहिणी देखील सध्या आलेल्या आहेत. त्यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ घालविणार आहे. माझी मुल, वडील, आई यांच्याशी देखील गप्पात माझा दिवस घालविणार आहे. पंतप्रधानांनानी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाच्या लढ्यात असणारे डॉक्टर, परिचारिका, पोलिस, पत्रकार यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी सर्वांनी रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता आपल्या घराच्या दारात, खिडकीत, बाल्कनीत येऊन घंटानाद करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT