trupti desai-indorikar
trupti desai-indorikar 
महिला

इंदुरीकर महाराजांनी लाॅकडाऊनमध्ये चांगले बोलण्याचा रियाज करावा : तृप्ती देसाईंचा न मागता सल्ला

महेश जगताप

पुणे : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे  देश लॉकडाऊन आहे. पुढील 21 दिवसांत किर्तनकार निवृत्ती देशमुख महाराजांनी चांगले बोलण्याचा रियाज करावा, असा सल्ला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला. त्यांच्या अनाहूत सल्ल्यामुळे निवृत्ती महाराज समर्थक आणि देसाई यांच्यात शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे .

महाराज कीर्तनामुळे अतिशय व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना चिंतन करण्याची हीच वेळ आहे. त्यांनी कीर्तनात हसवताना स्त्रियांविषयी अपशब्द बोलण्यापेक्षा चांगल्या शब्दाचा वापर करून समाज प्रबोधन करावे. स्त्रियांविषयी अनादराने बोलल्याबद्दल महाराजांनी या आधी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण मी इथून पुढे माझ्या कीर्तनात असे शब्द वापरणार नाही, असे त्यांनी अद्याप जाहीरपणे सांगितलेले नाही. तसे त्यांनी सांगावे, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली.

मी सुद्धा वारकरी सांप्रदायातील आहे. मी जर वर्षी नित्यनेमाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असते. त्यामुळे महाराजांच्या संप्रदायाला विरोध नसून त्यांच्या स्त्रीविषयी वक्तव्याला आमचा विरोध आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. कीर्तन हे समाज प्रबोधनासाठी असते. समाज बिघडवण्यासाठी नाही. समोर हजारो लोक ऐकत असतात त्यात अनुकरण करणारेही असतात, असा सल्ला देसाई यांनी दिला.

``गोरी बायको करू नका. ती पळून जाईल, हे कुठल्या ग्रंथात लिहिलेले आहे का? चप्पल कितीही भारी असली तर आपण ती गळ्यात घालत नाही. बायको आहे तिला त्याप्रमाणेच वागवा. महिलेची चपलेशी तुलना करून महिलांचा अपमान केला जात आहे. तो आम्ही सहन करणार नाही. समाजप्रबोधन करणाऱ्या सर्व कीर्तनकार यांचा आम्ही सन्मानच करतो आणि त्यांना पाठिंबा आहेच. यापुढे महिलांचा किंवा समाजातील कोणत्याही घटकाचा अपमान न करता जर इंदुरीकर कीर्तन करणार असतील आणि त्यांनी मला आमंत्रण दिले तर नक्कीच त्यांचे चांगले शब्द वापरलेले कीर्तन ऐकायला मोठ्या मनाने मी जाईन, असे देसाई यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT