Thane-Mayor
Thane-Mayor 
महिला

महापौर मीनाक्षी शिंदेंना तीन महिन्याचा बोनस

राजेश मोरे

ठाणे : ठाण्याच्या महापैार पदाचे आरक्षणची सोडत अद्याप निघालेली नसल्याने विद्यमान महापैार मीनाक्षी शिंदे यांना तब्बल तीन महिन्याचा वाढीव बोनस मिळणार आहे. सहा सप्टेंबर रोजी महापैारपदाची मुदत संपणार आहे.

पण त्यापूर्वी किमान दोन महिने आधी महापैाराच्या आरक्षणाची सोडत निघणे अपेक्षित होते. पण हे आरक्षण निघाले नसल्याने आणि नंतर विधानसभेची आचारसंहिता लागू होणार असल्याने महापैार शिंदे यांना किमान तीन महिनाचा बोनस मिळाला आहे.

महापौर मीनाक्षी शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन तीन महिन्यांची वाढीव मुदतवाढ मिळाली आहे. डिसेंबरपर्यंत त्या महापैार म्हणून कार्यरत राहणार आहेत.

शिवसेनेला याचा सर्वाधिक फायदा विधानसभा निवडणूकीत होणार आहे. विधानसभेत तिकिट कापण्यात येणाऱया संभाव्य उमेदवारांना महापैारपदाची संधी देण्याचे आमिष दाखविण्याचा सत्ताधाऱयांचा रस्ता या निर्णयामूळे आपोआप मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

ठाणो महापालिकेत शिवसेनेने पहिल्यांदा एकहाती सत्ता मिळवली आहे. महापौरपदासाठी महिला आरक्षण आल्याने मीनाक्षी शिंदे यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. अडीच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ येत्या 6 सप्टेंबर रोजी पूर्ण होणार होता.

नियमानुसार दोन महिने महापौर पदाचे आरक्षण होणे अपेक्षित होते. पण एक महिना शिल्लक असतानाही अद्याप महापैारपदाचे आरक्षण पडलेले नाही. तसेच त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. अशावेळी राज्य सरकराने विशेष निर्णय घेऊन महापैारांना तीन महिन्याचा वाढीव कालावधी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT