Navneet_kaur_rana
Navneet_kaur_rana 
महिला

नांदगावचे संतप्त विद्यार्थी धडकले खासदार नवनीत  राणा यांच्या घरी  

सरकारनामा

नांदगाव पेठ (जि. अमरावती) :  दररोज महाविद्यालयाला जायला उशीर होतो आणि आजही चालकाने बस थांबविली नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थी सकाळीच खासदार नवनित राणा यांच्या 'गंगा सवित्री' निवासस्थानी धडकले आणि एस.टी.च्या चालक, वाहकांप्रती संताप व्यक्त केला.

खासदार राणांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची त्वरीत दखल घेत लगेच एस.टी. विभाग नियंत्रकांना कॉल करुन दोषी चालकांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

शुक्रवारी सकाळी नांदगांव पेठवरून अमरावतीला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वरुड स्थानकाच्या दोन बसेसना नांदगाव पेठ स्थानकावर हात दाखविला, मात्र एकही बस थांबली नाही. त्यानंतर साडे आठ वाजता एमएच 40 एन 8538 क्रमांकाची एसटी बस स्थानकावर आली.

 वाहनात प्रवासी नसतांना देखील चालकाने तेथून बस दामटविली. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड संतापले. दररोज वरुड स्थानकाच्या वाहनांची ही समस्या असून विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयाला जायला उशीर होतो. अशा चालकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. 

आज घडलेल्या या प्रकारामुळे तब्बल दीडशे विद्यार्थ्यांनी खासदार नवनीत राणा यांच्या गंगासावित्री या निवासस्थानी धडक देत त्यांना या चालक वाचकांच्या मनमानीची तक्रार दिली. नवनीत राणा यांनी विभाग नियंत्रकांशी तात्काळ संपर्क करून चालक आणि वाहक यांना निलंबित करा आणि त्यापूर्वी त्यांना माझ्या घरी पाठवा, असा आदेश दिला.

यानंतर जलद व सर्वसाधारण बसेस नांदगाव पेठला न थांबल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याबाबतही राणा यांनी विभाग नियंत्रकांना सुनावले.

यावेळी धीरज खोकले, ऋत्विक इंगोले, प्रसाद आमले, पृथ्वी आमले, तुषार राऊत, शुभम पारवी, विशाल कुकडे,श्रीकांत कुकडे,तेजस जवंजाळ, हर्षल दारोकार, राज पोकळे, अश्विन कोठार, अनिकेत पाठशे, आदित्य पाठशे, अनिकेत भाकरे, मयुर डोंगरे, हेमराज शेलोकार, हिमांशी कुकडे, तेजस्विनी टारपे, पूर्वा चौधरी, तृप्ती गोबळे, वैष्णवी इंगोले, आचल साबनकर, सानिका पकडे, श्रेया झगडे यांच्यासह शंभरावर विद्यार्थी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT