amruta fadnavis-devendra fadnaivs
amruta fadnavis-devendra fadnaivs 
महिला

`माझ्यापेक्षा पत्नी अमृताचा पगार जास्त`

ज्ञानेश सावंत

मुंबई : माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला महिन्याकाठी जादा पगार मिळतो, म्हणूनच मी तिचा पगार लक्षात ठेवला आहे. ‘जीडीपी’ आणि ‘जीडीपी ग्रोथ’ ची व्याख्या सांगताना फडणवीस यांनी आपल्या घरातील पगाराचे गणित उलगडले. 

फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प-सोप्या भाषेत’ या पुस्तककाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याआधी फडणीस यांनी प्रस्ताविक केले. तेव्हा पत्नीचा पगार जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात अपेक्षेप्रमाणे राजकीय फटकेबाजी रंगली. देवेंद्र फडणवीस लिखित "अर्थसंकल्प - सोप्या भाषेत" या पुस्तक प्रकाशन सोहळा आज विधिमंडळाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला विधासनसभा अध्यक्ष नाना पटोले, सभापती रामराजे निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार उपस्थित होते.

नोटा हा अर्थकारणाचा गाभा असताना, मग तुम्ही देशातल्या नोटाच एका झटक्यात बंद करून टाकल्या .मग या नोटबंदीचा अर्थसंकल्पात समावेश व्हायला हवा होता का, नाही ?असा प्रश्न  ठाकरे यांनी या वेळी केला. 

भाषणात सुरवातीलाच मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता की मला आशा विषयावर भाषण करावा लागेल.
हा प्रसंग तुमच्यामुळे आला, अशी सुरवात करून ठाकरे म्हणाे की मला अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावा म्हणून हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे. मित्र असल्याने ते माझी काळजी घेतात. इथे तुम्ही पाहुणे म्हणून आहात आणि दुसऱ्याच्या खर्चातून कसा आपला कार्यक्रम करायचा, हे तुम्ही दाखवून दिले आहे. नोटबंदी हा निर्णय संबंध अर्थव्यवस्थेला दिशा देणारा होता. मग त्यासंबंधी चर्चा अर्थसंकल्पात व्हायला हवी होती. तरच लोकांना अधिक नोटाबंदीची जागृती झाली असती, असे या निमित्ताने ठाकरे यांनी विचारले.  त्याचबरोबर असेच पुढचे दहा वर्ष नवनवीन अर्थसंकल्पावरील पुस्तके लिहीत राहा, अशा शुभेच्छाही त्यांनी फडवणीस यांना दिल्या.

देवेंद्र फडणवीस यांनी सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगण्यासाठी पुस्तक लिहिले आहे. ते चांगले साहित्यिक आहेत. त्यांच्या अभ्यासाचा गौरव म्हणून आम्ही सर्व 288 आमदार त्यांना दिल्लीत पाठविण्यासाठी ठराव करू. म्हणजे आम्हाला `सुगीचे दिवस` येतील. माजी राज्यपाल राम नाईक यांनी त्यासाठी जरा दिल्लीत बोलावे, अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस हे दिल्लीत गेले तर सुधीर मुनगंटिवार अधिक खूष होतील, असा चिमटाही काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT