Ranas-&-Yashomati-Thakur
Ranas-&-Yashomati-Thakur 
महिला

यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर हल्लबोल करताच रवी राणा भडकले !

अरुण जोशी

अमरावती : सोमवारी काँग्रेस महापर्दाफ़ाश सभे दरम्यान काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी अमरावती लोकसभेतील खासदार नवनीत राणा यांच्या विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मनात असतांना मंचावर उपस्थित आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यावर आक्षेप घेत नवनीत राणा या भाजपच्या झाल्या असून काँग्रेस विरोधात काम करीत असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी सभे दरम्यान वातावरण चांगलेच तापले होते. 

 तर आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया देत खासदार नवनीत राणा यांच्या विजयाने काही लोकांच्या पोटात दुखत आहे, आमदार यशोमती ठाकूर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने त्या अशा प्रकारचे वक्तव्य करीत असल्याचे सांगितले.

 तर काँग्रेस पक्षाशी आमची कुठलीही बांधिलकी नाही, निवडणुकीत काँग्रेसने आम्हाला मदत केली तर काही ठिकाणी आम्ही सुद्धा त्यांना मदत केली. आमचे मुख्यमंत्र्यांशीही चांगले संबंध आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात काय होईल हे आताच सांगणे योग्य नाही. मात्र आम्ही संपूर्ण ताकदीने येणाऱ्या विधासभा निवडणुका लढू आणि जिंकू त्यामुळेच काही लोक अशी बेताल वक्तव्य करीत असल्याचेही आमदार रवी राणा यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT