Pankaja-Munde-Ajit-Pawar
Pankaja-Munde-Ajit-Pawar 
महिला

बारामतीच्या नेत्यांनी अगोदर स्वतःचा पक्ष सांभाळावा, पंकजा मुंडेंचा टोला

दत्ता देशमुख

बीड : बारामतीची मंडळी इकडे येऊन भाषणं ठोकतात, मी देशाच्या नकाशातून ज्योर्तिलिंगाचे नांव काढल्याचा आरोप करतात, असे खोटे आरोप करण्यापेक्षा अगोदर स्वतःचा पक्ष सांभाळा ,असा टोला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला . 

 धरणात ....   करण्याची भाषा करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे आपण उभारणार का ?  असा सवाल त्यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून केला .

मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर धनंजय मुंडे यांनी परळी बाजार समिती, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकांत बाजी मारली होती.  तो संदर्भ  घेत लोकल नेते लोकल निवडणुकाच जिंकतात, असा टोमणा  पंकजा मुंडे यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मारला . 

परळी येथील  वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रूपयांच्या आराखड्याच्या कामाचा तसेच विशेष रस्ता अनुदानातून मंजूर झालेल्या २० कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्ते कामाचे भूमिपुजन गुरुवारी रात्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. 

खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस, आर. टी. देशमुख, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, रमेश पोकळे, रमेश आडसकर, राजेंद्र मस्के आदी नेत्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांनी परळी मतदार संघासाठी केलेल्या कामांचा उहापोह करत विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली.

आपण मंजूर करुन आणलेली पाणी पुरवठा योजना, नगरोत्थान योजना त्यांनी खाल्ल्याचा गंभीर आरोप करत  त्यामुळेच तीर्थक्षेत्राचा निधी त्यांच्या हातात (नगर पालिकेकडे) दिला नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

दरम्यान, मागच्या विधानसभेत पराभवानंतर धनंजय मुंडे यांनी परळी बाजार समिती, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकांत बाजी मारली होती. आता विधानसभा तोंडावर असल्याने त्यांनी लोकल नेते लोकल निवडणुकाच जिंकतात अशी कोटी केली आहे. 

खासदार प्रितम मुंडे यावेळी बोलताना  म्हणाल्या,  प्रत्येक विकास कामात अडथळा आणण्याची त्यांची वृत्ती आहे. आपण दुष्ट प्रवृत्तींना आपल्या जवळही फिरकू देऊ नका .  आता चांगले आणि वाईट यापैकी एकाची निवड करायची आहे . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT