Rohini Khadse
Rohini Khadse 
महिला

खडसेंच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे बुलडाण्यातून विधानसभा मैदानात उतरणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या जळगाव जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांना बुलडाणा विधानसभा मतदार संघातून उमेदवारीचा आग्रह होत असून त्या निवडणूक लढविण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे या विधानसभा मैदानात उतरण्याची शक्‍यता अधिक व्यक्त होत आहे. त्यांचे नाव अगोदर मुक्ताईनगर मतदारसंघासाठी चर्चेत होते. अॅड.रोहिणी खडसे या बुलडाणा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी करण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.मुक्ताईनगर जवळचा हा बुलडाणा मतदार संघ असून सन 1999 मध्ये युती सरकारच्या कार्यकाळात एकनाथराव खडसे या मतदार संघात पालकमंत्री होते. त्यांनी मतदार संघात विकासाचे कार्य केले आहे. त्यामुळे या मतदार संघाशी त्यांचा जवळचा संबध आहे. 

या शिवाय या मतदार संघात वंजारी समाजाची संख्या मोठ्या संख्येने (कै.)गोपीनाथ मुंडे यांना माननारा वर्ग मोठ्या संख्येने आहे.(कै.) मुंडे दौऱ्यावर येत असतांना खडसे त्यांच्या समवेत या मतदार संघात त्यांच्या समवेत असत त्यामुळे या भागातील मतदारांशीही त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे अॅड.रोहिणी खडसे यांनी मतदार संघातून उमेदवारी करावी असा आग्रह असल्याचे सांगण्यात येत आहे.भाजप सेना युतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेचा आहे. गेल्यावेळी कॉंग्रेसचे हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांनी शिवसेनेचे संजय रामभाऊ गायकवाड यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता.

अॅड.रोहिणी खडसे बुलडाण्यातून मैदानात उतरण्याच्या तयारीत असून त्यांना शिवसेनेकडूनही आग्रह होत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले भास्कर जाधव तसेच बुलडाण्यातील शिवसेनेच्या काही नेत्यांनीही याबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बुलडाण्यातील त्यांच्या उमेदवारीबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT