sharad pawar-udhhav thackrey
sharad pawar-udhhav thackrey 
मंत्रालय

संकटकाळात आघाडीच्या नेत्यांनी फोनवरील संभाषण टाळले...

सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर गडबडून गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धीराने मार्ग काढून भाजपचा डाव भाजपवर उलटवला. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या यशामागे या आघाडीच्या नेत्यांनी आखलेल्या रणनितीचे यश असल्याचे सांगितले जाते.

महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाल्यावर अचानक अजित पवार यांनी राष्ट्रवादीला मागमुस न लागू देता बंड करीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह शपथविधी केला. पवार यांच्या बंडात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटला, असे चित्र निर्माण तर झाले. त्याचबरोबर 36 आमदार फुटले अशी चर्चा सुरू झाली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेचत डाचपेच आखले. फुटीर आमदारांना स्वगृही येण्यास भाग पाडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर दिला. तसेच राज्यपालांच्या भूमिकेबददल कायदेशीर लढाई लढण्याचे मनसुबे जाहीर केले.

यानुसार कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी नेमक्‍या कोणत्या जबाबदा-या स्वीकारायच्या आणि त्या पार पाडयाच्या ते ठरले. त्यानुसार कॉंग्रेस पक्षातील पृथ्वीराज चव्हाण , कॉंग्रेसचे दिल्लीतील "थिंक टॅंक' यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागून भाजपला उघडे पाडणे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी या तीन पक्षांच्या नेत्यांशी समन्व्य साधत राजकीय डावपेच तयार करण्याची भूमिका पार पाडली. शिवसेनेने तिन्ही पक्षांच्या सर्व आमदारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी उचलली.

या तीन पक्षांचे नेते फोनच्या माध्यमातून संपर्क करीत नव्हते. तर थेट भेट घेउन पुढील रणनिती आखत होते. त्यामुळे डावपेच उघड होण्याचे काहीच नव्हते. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हे थेट आमदारांवर लक्ष ठेवून होते. तर कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी विधीमंडळ जाणकारांचे सल्ले घेउन त्यांनुसार कार्यवाही करणे. तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, आदित्य ठाकरे यांनी फक्‍त तीन पक्षांच्या आमदारांवर लक्ष ठेवण्याची कामगिरी निभावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT