मंत्रालय

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आता उमेदवारी अर्ज होणार नाहीत बाद

उत्तम कुटे - सरकारनामा ब्युरो

पिंपरी - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारी अर्जातील
त्रुटी दूर करण्याची संधी तो भरताना वा त्याअगोदर मिळत नसल्याने अनेकांचे अर्ज आतापर्यंत बाद होत होते. मात्र, न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने आता ही संधी दिली दिल्याने आता एकही अर्ज बाद होणार नाही.

त्यामुळे अर्ज भरतानाच एखाद्याचा पत्ता साफ करण्याचे डाव आता हुकणार आहेत. दुसरीकडे उमेदवारांची संख्या त्यामुळे वाढणार आहे. राज्यातील तीन महापालिकांच्य आगामी निवडणुकीत या निर्णयाचा लाभ होणार आहे.

नुकत्याच झालेल्या पिंपरी-चिंचवड, पुण्यासह राज्यातील 25 महापालिका निवडणुकीत तांत्रिक दोषामुळे,तर काही ठिकाणी स्वाक्षरी राहिल्याने निवडून येऊ शकणाऱ्यांचे अर्ज बाद झाले होते. त्याविरोधात अनेकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याची सूचना आयोगाला केली होती.

त्यानुसार आयोगाचे अवर सचिव. नि. ज.वागळे यांनी 1 एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी त्यातील त्रुटी दूर करण्याची संधी उमेदवारांना देण्यात यावी असे कळविले आहे.

अर्ज बाद होण्याची कारणे
1) उमेदवार व अनुमोदक,सूचक यांच्या स्वाक्षऱ्या नसणे
2) शपथपत्रातील त्रुटी (अर्धवट अर्ज दाखल करणे)
3) मतदारयादी अनुक्रमांक चुकीचा टाकणे
4) नावातील बदलाबाबत सक्षम कागदपत्रे न देणे
5) महिला उमेदवारांबाबत लग्नापूर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव याबाबत राजपत्र व विवाह प्रमाणपत्र न जोडणे

कारणे दुरुस्तीसाठी देण्यात आलेली संधी
1) महिला उमेदवारांचे नावात बदल झाल्याचे प्रतिज्ञापत्र आता धरणार ग्राह्य.
2) उमेदवारी अर्जांची निवडणूक अधिकारी व कर्मचारी करणार प्राथमिक तपासणी
3) प्राथमिक तपासणीतील त्रुटी (उदा. उमेदवारासह सूचक, अनुमोदकाची सही नसणे आदी) नजरेस आणून त्या दूर करण्याची देणार संधी
4) ऑनलाइन अ्रर्ज भरल्यानंतर सादर करावयाच्या प्रिंट अर्जातही चुका सुधारण्यास वाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT