Bjp Leader Ekanath Khadse Got Huge Electricity Bill
Bjp Leader Ekanath Khadse Got Huge Electricity Bill 
मंत्रालय

एकनाथ खडसेंना वीज कंपनीचा शॉक; १लाख चार हजाराचे पाठविले बिल

कैलास शिंदे

जळगाव : 'लॉकडाऊन' काळातील अव्वाच्या सव्वा विजबिल अकारल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. परतु वीज कंपनी त्याला जुमानण्यास तयार नाहीत. माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनाही या वीज बिल वाढीचा फटका बसला असून मुक्ताईनगर नगर निवासस्धानाचे त्यांना चार महिन्याचे तब्बल एक लाख चार हजाराचे बील महावितरण कंपनीने पाठविले आहे. वीज वितरण कंपन्यांनी वाढीव बिले देवून नागरिकांना वेठीस धरून या अवास्तव वीज बिलांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी खडसे यांनी केली, आहे.

'कोरोना' महामारीच्या संकटामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन होते. त्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते. तसेच या काळात विजेचा वापरही कमी होतो. अशा स्थितीत वीज विजवितरण कंपन्यांनी चार महिन्यांची मोठ्या रकमेची बिल नागरिकांना दिली आहेत. त्याबाबत नागरिकांनी वीज कंपन्याकडे तक्रार केली आहे. मात्र अद्यापही नागरिकांना त्यांची वीज बिले कमी करून मिळालेली नाहीत. 

सर्वसामान्य नागरिकांसोबत आता राजकीय नेत्यांनाही या वाढीव विज बिलाचा फटका बसला आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री व भाजपाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनाच वीज कंपनीने बिलाचा शॉक दिला आहे. मुक्ताईनगर (जि.जळगाव )येथील त्यांच्या निवासस्थानाचे चार महिन्याचे बील एक लाख चार रूपये आकारण्यत आले आहे. त्यामुळे स्वत: खडसे यांनीही याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

याबाबत खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''घरात वीज बिल वापर कमी असतानाही एवढे बिल आले कसे, याचे आपणास अश्‍चर्य वाटत आहे. लॉकडाऊन काळात वीज वितरण कंपनीकडून वाढीव बिल येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना पाठविण्यात आलेली बिले अवास्तव व न भरण्यासारखी आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने या अवास्तव बिलांच्या तपासण्या कराव्यात. तसेच नागरिकांना या बिलात सुट द्यावी,'' 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT