Maharashtra Government Sarkarnama
मंत्रालय

Maharashtra Government : स्वातंत्र्य सैनिकांसाठी खूशखबर : निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा सरकारचा निर्णय

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लाभ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांना मिळणार आहे. त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनाही या मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे (freedom fighters) निवृत्तीवेतन (pension) दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने आज (ता. १७ नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीत घेतला आहे. पूर्वी स्वातंत्र्य सैनिकांना दरमहा १० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळत होते. आता ते दरमहा २० हजार रुपये मिळणार आहे. त्याचा राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना फायदा होणार आहे. (Government's decision to double the pension of freedom fighters)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी स्वातंत्र्य सैनिकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन मिळत होते. त्यात वाढ करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यामुळे या स्वातंत्र्य वीरांना आता दरमहा २० हजार रुपये मानधन मिळणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लाभ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांना मिळणार आहे. त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनाही या मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय राज्य सरकारने कृषी पणन अधिनियमात सुधारणा करण्याचे ठरविले आहे. त्या सुधारणेनुसार मतदार यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनाही बाजार समितीची निवडणूक लढवता येणार आहे.

  • मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

  • हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द

  • कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मुल्याधारित, मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय

  • सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाथवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १०७.९९ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ५०० हेक्टर जमिनीला फायदा

  • राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविले. आता मिळणार दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना लाभ मिळणार

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त सचिव ही पदे

  • नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करणार. २ हजार ५८५ लाखाचा निधी देण्याचा निर्णय

  • अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ .

  • ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. अधिसंख्य पदांवर सामावून घेणार

  • "जेएसपीएम विद्यापीठ, पुणे" या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता

  • राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु , प्र कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहीत केल्याप्रमाणे होणार

  • महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करणार

  • नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी आता १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येईल

  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार ६२९ कोटी रुपये कर्जरुपाने उभारण्यास मंजूरी. भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार.

  • एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या . ९ सप्टेंबर २०२० नंतरच्या निवड प्रक्रियेस मान्यता

  • आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात.महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार

  • आता पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस- आयओएन, व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेणार. भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT