Horse Mounted Police Soon in Mumbai
Horse Mounted Police Soon in Mumbai 
मंत्रालय

आता अश्‍वदल ठेवणार जमावावर नियंत्रण! : स्वातंत्र्यानंतर मुंबई पोलिस दलात प्रथमच समावेश

सरकारनामा ब्युरो

मुंबई : जमावावर नियंत्रण ठेवणे, मोकळ्या जागी गस्त घालणे, वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे तसेच अतिमहत्त्वाच्या कार्यक्रमावेळी संचालनाकरिता मुंबई पोलिस दलात स्वातंत्र्यानंतर प्रथमच अश्‍वदलाची निर्मिती करण्यात आली आहे. दलात 30 अश्‍वांचा समावेश असणार आहे. याशिवाय एक पोलिस उपनिरीक्षक, एक सहायक पोलिस उपनिरीक्षक, चार पोलिस हवालदार आणि 32 पोलिस शिपायांचा दलात समावेश असणार आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात आंदोलने होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अश्‍वदलाची स्थापना करण्यात आल्याची माहिती  पत्रकार परिषदेत देण्यात आली. प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या संचलनात अश्‍वदल सहभागी होणार आहेत.

यासाठी गेल्या चार महिन्यांपासून पोलिस अंमलदारांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणादरम्यान रेसकोर्स, हौशी रायडिंग क्‍लब आणि लष्करातील 61 घोडदळातील अनुभवी प्रशिक्षकांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. अश्‍वदलाद्वारे जमावावर नियंत्रण कसे मिळवावे, याबाबत पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे.

अश्‍वदलाचा फायदा

जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेथे वाहने जाणे अशक्‍य आहे, तेथे गस्त घालणारे घोडेस्वार जाऊन जमावावर नियंत्रण मिळवू शकतील. जमावापेक्षा घोडेस्वार अधिक उंचीवर असल्याने त्यांना जमावावरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT