mantralaya
mantralaya 
मंत्रालय

बदलीसाठी मंत्र्याकडून एकाच जागेवर चार -चार जणांना शिफारसी

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा ब्यूरो

मुंबई  : आपल्याला हवी असलेल्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी वजनदार मंत्र्यांची शिफारस मिळवण्यासाठी मंत्र्यालयात गेले काही दिवस चढाओढ पहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे एकाच जागेसाठी मंत्र्यांकडून चारचारजणांना शिफारस देण्याचा विक्रम दिग्ज मंत्र्यांकडून झालेला असलेल्याने एकाच ठिकाणावर कोणत्या अधिकाऱ्यांची वर्णी लावायची हा यक्ष प्रश्न विभागातील अधिकाऱ्यांना पडला आहे. 

मंत्रालयात सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे इच्छीत स्थळी व "मालदार" जागेवर पोस्टींगसाठी अधिकारी धडपडत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या शिफारस पत्रे जोडत लाँबिंग सुरू आहे.

त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मातब्बर मंत्र्यांना अनेकांना शिफारसी दिल्या आहेत. मात्र या घावूक शिफारसी वाटपात एकाच जागेवर चारचारजणांना शिफारस पत्र दिल्याने महसूल विभागातील अधिकाऱ्यांची पंचायत झाली आहे.

त्यामुळे नागरी सेवा मंडळाच्या बैठकीत बदलीच्या फाईल ठेवताना अधिकारी गोंधळ गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे वजनदार मंत्र्यांचे शिफारस आणणारे अधिकारी साम दाम या सारख्या मार्गाचाही अवलंब करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

त्यामुळे बदलीसाठी आलेल्या या गब्बर अधिकाऱ्यांची नाराजी ओढावून घेण्याची मानसिकता सध्या तरी कुठल्याच अधिकाऱ्यांची दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT