Mantralay
Mantralay 
मंत्रालय

मंत्रालयातील सात अतिवरिष्ठ सनदी अधिकारी प्रशिक्षणासाठी  रवाना 

सिद्धेश्‍वर डुकरे : सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई :  भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याच्या मसुरी येथील अकादमीतील  प्रशिक्षणासाठी मंत्रालयातील सात ज्येष्ठ सनदी अधिकारी रवाना झाले असून, हे प्रशिक्षण तब्बल वीस दिवस चालणार आहे .  

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी आणि प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांचा यामध्ये समावेश आहे.

सनदी सेवेतील प्रत्येक अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात प्रत्येक टप्प्यावर मसुरी येथील प्रशासकीय अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. यानुसार 4 जून ते 22 जून या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये मंत्रालयातील सचिव दर्जाच्या सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे मंत्रालयातील इतर अधिकाऱ्यांना या सात अधिकाऱ्यांचा पदभार वर्ग केला आहे. 

प्रशिक्षणासाठी जात असलेले महसूल व वनविभागाचे प्रधान सचिव अमिताभ जोशी यांचा पदभार अर्थ विभागातील प्रधान सचिव नितीन गद्रे यांच्याकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार यांचा पदभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव चं. प्र. जोशी यांच्याकडे तर  जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांचा पदभार जलसंपदा विभागाचे सचिव रा. बा. पानसे यांच्याकडे राहील .  

मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी यांचा पदभार मुख्यमंत्री यांच्या निर्देशा नुसार देण्यात येणार आहे. तर गगराणी यांचा मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक विभागाचा अतिरिक्‍त कार्यभार उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव व विशेष कार्य अधिकारी अनिल डिग्गीकर यांचा पदभार मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार देण्यात येणार आहे. 

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे महेश पाठक यांचा कार्यभार सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे, तर अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्‍याम तागडे यांचा कार्यभार सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT