Kannada Vs Marathi Sarkarnama
मुख्य बातम्या

kannada संघटनांना जशास तसे उत्तर देणार; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा

Kannada Vs Marathi : कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस कन्नड समर्थक संघटनांनी फोडली. तसेच चालकाला कर्नाटकात येताय तर कन्नडच बोलायचं असं म्हणत त्याच्या तोंडाला काळे फासले.

Hrishikesh Nalagune

kannada Vs Marathi : चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस चालकाला कन्नड संघटनांनी काळे फासल्याची घटना अतिशय निंदनीय आहे. कन्नड संघटनांना येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला आहे. ते सरकारनामा आणि सकाळशी बोलत होते.

एका बाजूला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून नियमित आंदोलनं सुरु असतात. अशात दुसऱ्या बाजूला कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस कन्नड समर्थक संघटनांनी फोडली. तसेच चालकाला कर्नाटकात येताय तर कन्नडच बोलायचं असं म्हणत त्याच्या तोंडाला काळे फासले. या घटनेवर महाराष्ट्रात (Maharashtra) संतापाची लाट उसळली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र-कर्नाटक बस वाहतूक तुर्तास थांबवण्यात आली आहे.

याबाबत बोलताना मनोहर किणेकर म्हणाले, शुल्लक कारणावरून कन्नड संघटना नेहमीच गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस चालकाला कन्नड संघटनांनी काळे फासल्याची घटना अतिशय निंदनीय आहे. कन्नड संघटनांना येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर दिले जाईल.

बेळगाव आणि सीमा भागातील मराठी भाषिकांवर दादागिरी करून कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटना अन्याय करीत आहेत. याची महाराष्ट्र सरकारने लवकर दखल घेतली पाहिजे. गेली अनेक वर्षे लोकशाहीच्या मार्गातून महाराष्ट्रात जाण्यासाठी मराठी भाषिक (Marathi) लढा देत आहेत त्याला महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेने साथ दिली पाहिजे, अशीही मागणी किणेकर यांनी केली.

कन्नड संघटनाना प्रशासनाने आवर घालावा अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीलाही आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे, असेही किणेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT