Suresh dhas  Sarkarnama
मुख्य बातम्या

Santosh Deshmukh-Mahadev Munde कुटुंबियांची भेट... धसांचं 'डॅमेज कंट्रोल' कितपत यशस्वी?

Suresh Dhas Meets Families of Santosh Deshmukh and Mahadev Munde in beed : सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Hrishikesh Nalagune

Beed News : भाजप आमदार सुरेश धस यांची गत महिनाभर संपूर्ण राज्यात हवा झाली. प्रत्येक वृत्तवाहिन्यांवर धस दिसत होते, वृत्त पत्रांमध्ये धस यांनी केलेल्या आरोपांना फ्रंट पेज जागा मिळायची. युट्यूबवरील वाहिन्यांनी धस यांच्या बातम्यांच्या माध्यमातून लाखो व्हूव्ज घेतले. पण मागच्या आठवड्यात धस यांच्या याच हवेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाचणी लावली.

धनंजय मुंडे आणि सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या भेटीची बातमी बावनकुळे यांनी फोडली. फक्त बातमीच दिली नाही तर जवळपास साडे चार तासांची ही भेट होती, दोघांमध्ये चर्चा झाली. मतभेद आहेत पण मनभेद नाहीत, अशी वक्तव्ये करून धस यांच्या बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित संपूर्ण लढ्यावरच संशय निर्माण केला. मनोज जरांगे पाटील यांनीही धस यांनी केसाने गळा कापल्याची प्रतिक्रिया दिली.

धस यांनी यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये घेतलेला युटर्न बघता त्यांच्याभोवतीचे संशयाचे कोंडाळे वाढले. पण या सगळ्यावर धस यांनी आपण कोणतीही सेटलमेंट केलेली नाही, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय मिळवून देणारच असे ठामपणे सांगितले. आता धस पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. झालेले डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांनी थेट मस्साजोग गाठले. तिथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. पाठोपाठ महादेव मुंडे यांच्याही कुटुंबियांची भेट घेतली.

धस यांचे डॅमेज कंट्रोल कितपत यशस्वी?

या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी या दोन्ही ठिकाणांहून धस यांनी कोण कोणत्या मागण्या केल्या, ते पाहू. सुरेश धस यांचा संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याची शंका सुरूवातीपासूनच आहे. तीच शंका त्यांनी आज पुन्हा बोलून दाखविली. वाल्मिक कराड याला मिळणाऱ्या तुरुंगातील व्हीआयपी ट्रिटमेंवर त्यांनी भाष्य केले. वाल्मिक कराडला चहा कोण आणून देते? जेवण कोण आणून देते? काही लोकांना मटण-चिकन कसे पोहोचते? असा सवाल केला.

या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली तीच मुळात वाल्मिक कराडमुळे. पण याच वाल्मिक कराडच्या व्हीआयपी ट्रिटमेंटवर भाष्य करत आपण मॅनेज झालो नसल्याचे धस यांनी एक प्रकारे दाखवून दिले. बीड जिल्ह्यात केवळ अधिक्षक बदलून उपयोग नाही, अतिरिक्त अधिक्षक म्हणून पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी, विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागण्यांवर ते आजही कायम आहेत.

संतोष देशमुख यांचे पार्थिव बोरगाव शिवारातून उचलल्यावर शासकीय रूग्णालय केजकडे नेणे अपेक्षित होते. मात्र उप निरीक्षक राजेश पाटील यांनी कळंबकडे नेले. ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर गाडी परत वळवली. पोलीस अधिकारी महाजन यांची बीड येथे नियुक्ती आहे त्यांचे कामकाज केज पोलीस ठाण्यात कसे काय चालते? असे तिखट सवाल करत या दोघांना सस्पेंड करून सहआरोपी करावे, अशी मागणी त्यांनी केली. एक प्रकारे माहिती नसलेल्या गोष्टी धस यांनी महाराष्ट्रापुढे आणल्या.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दहाव्या आरोपीचाही सहभाग आहे. नितिन बिक्कड यानेच धनंजय मुंडे यांच्या घरी बैठक बसवली होती. त्यानेच वाशीमधून आरोपींना पळून जाण्यास मदत केली होती. त्यामुळे नितिन बिक्कड यालाही सहआरोपी करावे, फरार आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करण्यात यावी. दिलीप गीते, गोरख फड आणि दत्ता बिकड यांनाही सहआरोपी करा, या सर्वांचे सीडीआर तपासले जावे, अशा मागण्या धस यांनी केल्या. थोडक्यात धस पूर्वीप्रमाणेच आजच्या पत्रकार परिषदेत आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले.

ही भेट घेऊन धस महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले. तिथेही त्यांनी पुन्हा आकाला अर्थात वाल्मिक कराडला लक्ष केले. या प्रकरणात आकाच्या आकाचा नसेल मात्र आकाचा हात नक्की असेल असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाही पण वाल्मिक कराडवर निशाणा कायम ठेवला. थोडक्यात जोपर्यंत वाल्मिक कराड लक्ष्य ठेवू तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर प्रेशर कायम राहील याची काळजी धस घेताना दिसले.

धस यांनी बीड पोलिसांवरही प्रश्न चिन्ह उपस्थित करत आपण पोलिसांप्रतिही मृदू झालेलो नाही, हे दाखवून दिले. या सगळ्या प्रकरणात आपण देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे धस यांनी सांगितले आहे. आता ही भेट घेतल्यास फडणवीस यांचा अजूनही धस यांना पूर्ण पाठिंबा आहे, असा संदेश जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT