Ashok Chavan
Ashok Chavan  
मुलाखती

जनतेला मी महाराष्ट्रात हवा होतो : अशोकराव चव्हाण

सरकारनामा

नांदेड : लोकसभेत भोकर विधानसभा मतदारसंघातून केवळ पाच हजाराचे मताधिक्य मिळाले व माझा लोकसभेत पराभव झाला. त्याच भोकर मतदारसंघातून जवळजवळ एक लाख मताधिक्यानी जनतेने मला निवडून दिले ,या वरून जनतेला मी महाराष्ट्रात हवा होतो, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथे दिली.


 ते पुढे म्हणाले, भोकर मध्ये द्वेशाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्ययांना जनतेनी चपराक दिली आहे.  भोकरच्या मतदारांनी २००९ च्या पुनरावृत्ती  केली आहे. भोकर मतदार संघातील जनता व माझे नाते अतुट असे आहे. निवडणुकीत विकासाची जी जी आश्वासने दिली होती ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पाच वर्षात मराठवाडा, नांदेड यासह भोकरच्या विकासाकडे आपले विशेष लक्ष असेल. 


त्यांनी  मतदार संघातील जनता व काँग्रेस कार्यकर्ते यांचे त्यांनी मनापासून आभार मानले. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला जरी चार जागा मिळाल्या असल्या तरी हे यश अपेक्षेपेक्षा कमी आहे.  नांदेड दक्षिण ची जागा आल्याचा आनंद झाला पण उत्तरची जागा केवळ मतविभाजनामुळे गमावल्याचे आपणास दुःख असल्याचे त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेच्या प्रक्रीयेत कांहिही घडू शकते याचे सुतोवाच त्यांनी या वेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT