Saif Ali Khan Attack Sarkarnama
मुलाखती

Saif Ali Khan Attacked:सैफवरील हल्ल्यानंतर मुंबई अनसेफ? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis's first reaction on Saif Ali Khan Attacked: मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणं चुकीचं आहे. मुंबई संपूर्ण सुरक्षित आहे. या हल्ल्यामागील आरोपींनी लवकरच पकडण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Mangesh Mahale

Mumbai News: अभिनेता सैफ अली खान याच्यावरील चाकू हल्ल्यामुळे मुंबईची मायानगरी हलली आहे. बांद्रा परिसरातील सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सैफवरील हल्लानंतर बॉलिवुड कलाकार अनसेफ असल्याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

सैफ अली खान यांच्या हल्लाबाबत पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली आहे. मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणं चुकीचं आहे. मुंबई संपूर्ण सुरक्षित आहे. या हल्ल्यामागील आरोपींनी लवकरच पकडण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते माध्यमाशी बोलत होते.

हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने चोर सैफ याच्या घरात शिरला, या प्रकऱणात दोन आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाची ओळख पटली असून अन्य आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी पंधरा पथके तयार करण्यात आली आहेत.

मुंबई सारख्या शहरात एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात चोरटा शिरतोच कसा, असा प्रश्न राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी उपस्थित केला आहे. विरोधकांकडून या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी, सुप्रिया सुळे आदींनी सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

"मुंबईत सेलिब्रिटीही सुरक्षित नसतील तर मग कोण सुरक्षित आहे?" असा सवाल प्रियंका यांनी उपस्थित केला आहे. "बाबा सिद्दीकींचं कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहत आहे. बाबा सिद्दीकींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सलमान खानला बुलेटप्रूफ घरात रहावं लागत आहे. आता सैफ अली खानवर हल्ला झाला," असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. "हे सारं वांद्रा येथे घडलं आहे जिथे सर्वाधिक सेलिब्रिटी राहतात. या अशा परिसरामध्ये पुरेश्या प्रमाणात सुरक्षा असणं अपेक्षित आहे," असा उल्लेखही प्रियंका चतुर्वेदींनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT