Education Minister Varsha Gaikwad
Education Minister Varsha Gaikwad sarkarnama
मुंबई

वर्षा गायकवाडांची मोठी घोषणा ; दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क माफ

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबतची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी टि्वट करीत महत्वाची घोषणा केली आहे.

''यंदाच्या वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क (10th and 12th board exam fees)कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार नाही,'' असे टि्वट वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)यांनी केले आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, ''कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या या मुलांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोविड काळात दीड वर्षात राज्यात लाखो जण बाधित झाले आहेत, तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. या संकटात अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी 50 हजार रुपये देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने आठ दिवसापूवी घेतला आहे. याबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहे. त्यामुळे कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे. ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. याने केंद्राला आदेश दिले होते. ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

आफ्रिकेतील देशांमधून (African Countries) मुंबईत दाखल झालेल्यांपैकी आणखी तीन प्रवाशांना कोरोना (Three People) ससंर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता आफ्रिकन देशातून मुंबईत आलेल्या चार जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. एकूण चार जण कोरोनाबाधित झाले असून यांना मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन (Omicron) विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यानं मुंबईकरांची चिंता वाढलीय. यापूर्वी महाराष्ट्रात आफ्रिकन देशातून प्रवास करुन आलेल्या सहा जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. त्यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली येथील व्यक्तींचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT